कोरोनाचा संसर्ग आणि व्हायरसला रोखण्यासाठी गायीचं दूध अत्यंत उपयुक्त! नव्या संशोधनानं चकीत करणारी माहिती समोर
कोरोनाचे संक्रमण आणि वायरस ची संख्या कमी व्हावी यासाठी संशोधका कडून वेगवेगळे संशोधन केले जात आहे. नुकतीच एक गोष्ट समोर आलेली आहे की, गायीच्या दुधामुळे कोरोनाचे संक्रमण भविष्यात रोखण्यासाठी मदत होणार आहे ,चला तर मग जाणून घेऊया संशोधनामागील गोष्ट!
मुंबईः आयुर्वेदामध्ये गायीच्या दुधाचे अनेक फायदेही सांगण्यात आलेले आहे परंतु नुकत्याच केलेल्या संशोधनामध्ये एक गोष्ट सिद्ध झाले आहे की, गायीचे दूध कोरोना पासून संरक्षण मिळवण्यासाठी देखील कार्य करत आहे. हा दावा मिशिगन यूनिवर्सिटी (University of Michigan) चे संशोधकांनी केलेला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, गायीचे दूध (Cow Milk) दोन पद्धतीने कार्य करू शकते. पहिले हे आपल्याला कोररोना म्हणजेच covid-19 संक्रमणापासून वाचवू शकते आणि दुसरे म्हणजे कोरोना चे संक्रमण झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये वायरस ची होणारी वाढ देखील या गायीच्या दुधामुळे रोखू शकते. चला तर मग जाणून घेऊया या दुधा मध्ये असे काय आहे हे व्हायरस संक्रमानाला रोखू शकते त्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी…
संशोधकांच्या मते गायीच्या दुधामध्ये बोविन लेक्टोफेरिन (Bovine Lactoferrin) प्रोटीन असते, ज्यात व्हायरसला थांबविण्याची क्षमता असते. हे प्रोटीन आपल्या शरीरातील covid-19 ला शरीरात वाढ होऊ देत नाही. हे विशेष प्रकारचे प्रोटीन अनेक व्हायरस किटाणू जीवाणूपासून आपल्या शरीराचे संरक्षण करते.
व्हायरल डिफेन्स मेकॅनिझम
मुख्य संशोधक जोनाथन सेक्सटन यांचे म्हणणे आहे की, संशोधन दरम्यान एक गोष्ट प्रामुख्याने सिद्ध झाले की, गायीच्या दुधामध्ये उपलब्ध असणारे हे विशेष प्रकारचे प्रोटीन कोरोना व्हायरसला ब्लॉक करून देते परिणामी व्हायरस आपल्या शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. हे एका प्रकारचे व्हायरल डिफेन्स मेकॅनिझम आहे.
संक्रमणाची गंभीरता कमी
संशोधकांचे असे म्हणणे आहे की,या विशेष प्रकारच्या प्रोटीन ओरली देऊ शकतो म्हणजे आपण तोंडाने हे प्रोटीन सेवन करू शकतो यामुळे संक्रमणाची गंभीरता कमी केली जाऊ शकते.डेयरी साइंस जर्नल मध्ये पब्लिश झालेल्या रिपोर्टनुसार गायीच्या दुधामध्ये उपलब्ध असणाऱ्या या प्रोटीनच्या मदतीने या प्रकारचे आजार भविष्यात रोखता येऊ शकतील आणि त्याचबरोबर त्वरित उपचार देखील करता येईल.
आजार रोखण्यासाठी काही उपचारांची गरज
सेक्सटन यांचे म्हणणे असे आहे की ,अशा काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार रोखण्यासाठी काही उपचारांची गरज आहे. हल्ली उपचार करणे खूपच महाग झालेले आहे. या सर्व परिस्थितीमध्ये हे प्रोटीन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल. या प्रोटीन च्या मदतीने लोकांना लवकर बरे करता येईल त्याचबरोबर ज्या व्यक्तींना नवीन आजार उद्भवत आहे अशा ठिकाणी हे प्रोटीन वापरणे लाभदायक ठरणार आहे.
संबंधित बातम्या
Video: नशीब वेळीच गाडीबाहेर पडले, नाहीतर…? Holiसाठी यवतमाळहून वर्ध्याला जाताना भररस्त्यात अग्नितांडव