कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला लसीच्या आपत्कालीन वापराला अखेर परवानगी

गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाशी झुंजणाऱ्या देशवासियांसाठी दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. (DCGI approves Serum, Bharat Biotech vaccine for restricted use)

कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला लसीच्या आपत्कालीन वापराला अखेर परवानगी
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 11:44 AM

नवी दिल्ली: गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाशी झुंजणाऱ्या देशवासियांसाठी दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. अखेर भारताच्या औषध महानियंत्रक (डीसीजीआय)कडून कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला आणि झायडस कॅडिला या लसीच्या तिसऱ्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. येत्या 6 जानेवारीपासून या लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (DCGI approves Serum, Bharat Biotech vaccine for restricted use)

आज डीसीजीआयची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला या तिन्ही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या आठवडाभरातच फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस टोचली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

झायडस कॅडिलाच्या ट्रायलला मंजुरी

सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही व्हॅक्सिन 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येऊ शकतं, असं डीसीजीआयने सांगितलं. तसेच झायडस कॅडीच्या तिसऱ्या ट्रायललाही मंजुरी देण्यात आल्याचंही डीसीजीआयने स्पष्ट केलं आहे.

दोन डोस देणार

या दोन्ही व्हॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित असून त्यांचा आपत्कालीन वापर केला जाऊ शकणार आहे. तसेच रुग्णाला दोन्ही इंजेक्शनचे दोन-दोन डोस घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे त्याचा अधिक परिणाम होणार असल्याचं डीसीजीआयने स्पष्ट केलं आहे.

5 कोटी डोस तयार

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनिकाच्या कोव्हिशिल्डच्या उत्पादनाचं काम सीरम इन्स्टिट्यूटला मिळेलालं आहे. सीरमच्या दाव्यानुसार कोरोनाच्या नव्या संसर्गावरही ही व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे. कोरोना संसर्गात फारसा बदल झालेला नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळेच ही व्हॅक्सिन अधिक परिणामककारक ठरण्याची शक्यता आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी यापूर्वीच या व्हॅक्सिनचे 5 कोटी डोस तयार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस टोचली जाण्याची शक्यता आहे.

लसीची किंमत?

सीरमने खासगी कंपन्यासाठी या लसीची किंमत प्रति डोस एक हजार रुपये ठेवली आहे. तर भारत सरकारला 200 रुपयात एक डोस देण्यात येणार आहे. म्हणजे या व्हॅक्सिनच्या दोन डोसची किंमत 400 रुपये असणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही किंमत आकारली जाणार नाही. शिवाय देशातील गोरगरीबांनाही ही लस मोफत मिळावी म्हणून केंद्राकडून लवकरच काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (DCGI approves Serum, Bharat Biotech vaccine for restricted use)

संबंधित बातम्या:

LIVE | डीसीजीआयकडून कोवॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या लसींना आपत्कालीन वापराला परवानगी

शरीराला निरोगी राखण्यात मदत करतील ‘ही’ डीटॉक्स ड्रिंक्स, डाएटमध्ये नक्की सामील करा!

आधी मोफत लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी

(DCGI approves Serum, Bharat Biotech vaccine for restricted use)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.