मधुमेह आणि हृदयविकार एकत्र असलेल्यांना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका अधिक, एका नव्या संशोधनाचा दावा

स्मृतीभ्रंशाचा आजार हा काही दशकांत हळूवारपणे वाढतो. सुरुवातीला थोडे विस्मरण अशा पातळीवर या आजाराला सुरुवात होते. याबाबतच्या चाचण्या योग्य वेळेला केल्या, तरच याचा धोका समजू शकतो. नंतर मात्र याचा धोका वाढत जातो आणि विस्मरण होत असल्याचे आणि आठवणीत राहत नसल्याचे रुग्णाच्या लक्षात येते.

मधुमेह आणि हृदयविकार एकत्र असलेल्यांना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका अधिक, एका नव्या संशोधनाचा दावा
DementiaImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 10:44 PM

वॉशिंग्टन – जर रुग्णाला डायबेटिस (Diabetes)आणि ह्रद्यविकार ( heart disease)हे दोन प्रकारचे आजार असतील, तर अशा रुग्णांना स्मृतीभ्रंश (risk of dementia)होण्याचा धोका जास्त असतो, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. हा स्मृतीभ्रंशाचा धोका कमी करायचा असेल तर, मधुमेह, ह्रद्य आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांना प्रतिबंध करणे गरजेचे आहे. हा निष्कर्ष स्वीडनमधील कार्कोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाबाबतच्या जर्नलमध्ये मांडण्यात आला आहे. टाईप दोन डायबेटिस, ह्रद्यविकार(इस्केमिक ह्रद्यरोग, ह्रद्य बंद पडणे किंवा एट्रियल फायब्रिलेशन) आणि स्ट्रोक्स तथाकथित कार्डिओमेटाबॉलिक रोग हे स्मचीभ्रंशाचे काही मुख्य जोखमीचे घटक आहेत. ह्रद्यविकार आणि मधुमेह हे आजार एकत्र असल्याने स्मृतीभ्रंशाचा धोका किती परिणामकारक असतो, याचे संशोधन काही अभ्यासात करण्यात आले होते. हेच आम्हाला आमच्या अभ्यासात तपासायाचे आहे, अशी माहिती अबिगेल डोव्ह, या एगिंग रिसर्च सेटंरच्या डॉक्टरकी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिली आहे. हे रिसर्च सेंटर कार्कोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या न्यरोबॉयोलॉजी विभागांतर्गत आहे.

कसा वाढतो स्मृतीभ्रंशाचा आजार

स्मृतीभ्रंशाचा आजार हा काही दशकांत हळूवारपणे वाढतो. सुरुवातीला थोडे विस्मरण अशा पातळीवर या आजाराला सुरुवात होते. याबाबतच्या चाचण्या योग्य वेळेला केल्या, तरच याचा धोका समजू शकतो. नंतर मात्र याचा धोका वाढत जातो आणि विस्मरण होत असल्याचे आणि आठवणीत राहत नसल्याचे रुग्णाच्या लक्षात येते. मात्र त्याही परिस्थितीत ते स्वताकडे लक्ष देऊ शकतात, नंतर मात्र त्यांचा पूर्णपणे स्मृतीभ्रंश होतो. एकापेक्षा जास्त कार्डिओमेटाब़लिक आजार असणे स्मृतीभ्रशांचा धोका दुपटीने वाढवतो.

२५०० जणांवर संशोधन करुन केला अहवाल तयार

६० वर्षे वयावरील अडीच हजार निरोगी, स्मृतीभ्रंश नसलेल्या व्यक्तींचे निरीक्षण करुन हा डेटा गोळा करण्यात आला. प्राथमिक पातळीवर, मेडिकल रेकॉर्ड आणि क्लिनिकल चाचण्या करुन कार्डिओमेटाबॉलिक आजारांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर सहभागी झालेल्यांचे १२ वर्ष सातत्याने निरीक्षण करण्यात आले. त्यांच्या वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्या करण्यात आल्या. त्यांच्या स्मरणशक्तीच्या, संज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या. यात काही बदल झाला आहे का, स्मृतीभ्रंशात काही वाढ झआली आहे का याची तपासणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

दोन आजार एकत्र असलेल्यांना अधिक धोका

एकापेक्षा जास्त कार्डिओमेटाबॉलिक आजार असलेल्यांच्या मेंदूत विस्मरणाची गती जास्त असते. विस्मरणाची गती यात झपाट्याने वाढते, तसेच स्मृतीभ्रंशही लवकर होत असल्याचे समोर आले आहे. दोनच वर्षांत हा आजार जास्त बळावतो, असेही लक्षात आले आहे. आजारांची संख्या जेवढी जास्त तेवढा स्मृतीभ्रंश जलद होण्याचा धोका अधिक असतो. ज्या रुग्णांना एकाहून जास्त आजार आहेत, त्यातही ज्यांना डायबेटिस आणि ह्रद्याचे आजार आहेत त्यांचे विस्मरण जलद गतीने होत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती डोव्ह या संशोधकाने दिली आहे.

दुसऱ्या आजारापासून वाचण्याची गरज

ज्या रुग्णांना केवळ एकच कार्डिओमेटाबॉलिक आजार असेल, त्यांना स्मृतीभ्रंशाचा तितकासा धोका नसल्याचतेही समोर आले आहे. ही खूप चांगली बातमी आहे. जर एखाद्या रुग्णाला किमान दोन आजार असतील तरच त्याला स्मृतीभ्रंश होण्याचा जास्त धोका असल्याचे दिसते आहे. त्यामुळे एक आजार असेल तर दुसऱ्या आजारापासून वाचवले तर स्मृतीभ्रंशाचा धोका कमी होऊ शकतो. ज्या रुग्णांचे वय ७८ पेक्षा कमी आहे, त्यांना स्मृतीभ्रंशाचा धोका जास्त असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे चाळीशीनंतरच याबाबत उपाययोजना करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ज्यांना वयाच्या चाळीशीत असे आजार आहेत, त्यांनी स्मृतीभ्रंशांच्या आजाराचा धोका जास्त होऊ शकतो. त्यामुळे आत्तापासूनच काळजी घेण्याची गरज आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.