Diabetes tips: अचानक शुगर लेव्हल वाढली असेल तर आताच करा काही घरगुती उपचार, शुगर येईल लवकरच नियंत्रणात!

Blood sugar level tips: जर ब्लड शुगर लेव्हल 200 ते 300 एमजी/डीले पेक्षा जास्त झाली असेल तर अशावेळी डॉक्टरांना त्वरित संपर्क साधायला हवा. तसे पाहायला गेले तर काही घरगुती(home remedies) उपायाने आपण आपली शुगर नियंत्रणात आणू शकतो.

Diabetes tips: अचानक शुगर लेव्हल वाढली असेल तर आताच करा काही घरगुती उपचार, शुगर येईल लवकरच नियंत्रणात!
अचानक शुगर लेव्हल वाढली असेल तर आताच करा काही घरगुती उपचार
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 11:41 PM

मुंबई : बिजी शेड्युल, ताण-तणाव आणि खराब झाली लाइफस्टाइल या कारणांमुळे अनेकदा हाय बीपी (High BP), थायरॉइड आणि डायबिटीज (Diabetes tips in Marathi) सारखे गंभीर आजार तुम्हाला सहजच होऊ शकतात. एवढंच नाही तर या सगळ्यात गंभीर कारणामुळे सुद्धा तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल मर्यादेपेक्षा जास्त वाढून जाते. अचानकपणे वाढलेली शुगर अनेक समस्या निर्माण करते आणि यामुळे ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते. जर तुमचे शुगर लेव्हल योग्य पद्धतीने नियंत्रणात येत नसेल तर अशा वेळी किडनीला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो किंवा अनेक समस्या निर्माण होऊ शकतील. अशा वेळी शरीरातील शुगर लेवल मर्यादेपेक्षा जास्त वाढली असेल तर कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा आणि योग्य ते उपचार सुद्धा करणे गरजेचे आहे. असे म्हटले जाते की, जर ब्लड शुगर लेव्हल 200 ते 300 एमजी/डीले पेक्षा जास्त झाली असेल तर अशावेळी डॉक्टरांना त्वरित संपर्क साधायला हवा तस पाहायला गेले तर काही घरगुती(home remedies) उपायाने आपण आपली शुगर नियंत्रणात(control) आणू शकतो

पाणी पिणे

तज्ज्ञ मंडळींच्या मते जर तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल खूपच मर्यादेपेक्षा जास्त वाढली असेल तर अशा वेळी आपल्या शरीरातील शुगर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील जमा झालेली एक्स्ट्रा शुगर बाहेर निघून जाते आणि एवढेच नाही तर तुमचे शरीर हायड्रेट असेल तर सुद्धा ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल होऊ शकते असे म्हटले जाते की ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी आवश्य प्यायला हवे.

कारले

नियमितपणे कारले खाल्ल्याने तुमच्या शरीरातील शुगरची मात्रा हा मर्यादित राहते व त्याचबरोबर डायबिटीससुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते असे म्हटले जाते की, कारल्यामध्ये उपलब्ध असणारे अनेक पोषक तत्व आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरतात तसेच कारल्यामध्ये आपल्या शरीराला प्रभावित करणारे ग्लुकोज मेटाबॉलिज्म सारखे घटक उपलब्ध असतात. जर तुम्हाला शुगर सारख्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर अशा वेळी सकाळी उपाशीपोटी कारल्याचा रस अवश्य सेवन करावा. तुम्ही कारल्याची भाजी सुद्धा बनवून नियमितपणे खाऊ शकता असे केल्याने तुमची शुगर नियंत्रणात येईल.

जांभूळ

जांभळामध्ये एंथोसायनिन, एलेजिक एसिड यासारखे अनेक गुणधर्म असतात आणि म्हणूनच हे पदार्थ आपल्या शरीरातील इन्शुलिनला नियंत्रित करते. जांभळाच्या वनस्पतीचा प्रत्येक अंग डायबिटीस रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो. जांभळीच्या बियांमध्ये विशेष करुन ग्लाइकोसाइड जम्बोलिन आणि अल्कलॉइड जंबोसीन हे घटक तत्त्व आपल्याला आढळतात, जे आपल्या शरीरातील ब्लड शुगरल लेव्हलला नियंत्रण करत असतात.

एक्सरसाइज

कोणत्याही प्रकारच्या आजारांना जर आपल्याला संपवायचे असेल तर तसेच शरीरातील प्रभाव जर कमी करायचा असेल तर आपल्याला नियमितपणे एक्ससाइज म्हणजेच व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. नियमितपणे केलेला व्यायाम, एक्सरसाइज तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर करण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ज्या व्यक्तींना डायबिटीज शुगरची समस्या आहे अशा व्यक्तीने सुद्धा नियमितपणे एक्ससाइज करणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढली असेल तर योग्य तो व्यायाम केल्याने शुगर नियंत्रणात येते. ज्या व्यक्तींना व्यायाम करणे शक्य होत नाही अशा व्यक्तींनी डॉक्टरच्या सहाय्याने हलके फुलके एक्ससाइज करणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या छोट्या-मोठ्या क्रिया केल्याने सुद्धा तुम्ही घरच्या घरी तुमची शुगर लेव्हल नियंत्रणात आणू शकता.

इतर बातम्या

..जाता जाईना कोरोना! कोविडचा प्रभाव अजून 2 दशकं, आरोग्य संघटनेचा नवा अलर्ट

Health care: शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी लाभदायक ठरते सुपारी, जाणून घ्या सुपारीचे अनेक फायदे

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.