दमा रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरतात धोकादायक, आजच बदला आपला डाएट

दमा हा फुप्फुसांशी संबंधित आजार आहे. शरीरात दम्याची लक्षणे दिसताच आपण आपल्या आहारातून काही पदार्थ वगळायला हवेत. असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने दम्याची लक्षणे अजून वाढू शकतात. त्यामुळे दमा किंवा अस्थमाच्या रुग्णांनी काय खावे आणि काय नाही याचा डाएट प्लान तयार केला पाहिजे.

दमा रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरतात धोकादायक, आजच बदला आपला डाएट
Astama (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 2:25 PM

मंबई : जुन्या व चिवट आजारांमध्ये दमा किंवा अस्थमाची (asthma) गणना केली जाते. या आजारात रुग्णांच्या श्‍वसननलिका फुगतात व आकुंचन पावतात ज्यामुळे श्वास घेण्यास (breathing) त्रास होत असतो. जे लोक अस्थमाचे रुग्ण आहेत, त्यांना नेहमी एक प्रश्‍न पडत असतो, की त्यांनी त्यांच्या आहारात कोणते बदल करायला हवेत, जेणेकरून त्यांचा आजार आणखी वाढणार नाही. अनेकदा दम्यावर लोक उपचार तर घेतात परंतु त्याच्या आहाराकडे (diet) नीट लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांना अजूनच दम्याचा त्रास जाणवत असतो. योग्य आहार घेतल्यास दम्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळत असते. दम्याच्या दम्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणताही विशेष आहार नसला तरी एका संशोधनानुसार, असे अनेक पदार्थ आहेत जे फुप्फुसांच्या कार्यासाठी तसेच शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहेत.

या पदार्थांचा समावेश करा

1. व्हिटॅमिन डी

दम्याबाबत आतापर्यंत झालेल्या सर्व संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्यास प्रौढ आणि लहान मुलांमध्ये दम्याचा धोका वाढतो. इतकंच नाही तर फुफ्फुसाच्या कार्याला मदत करण्यासोबतच, व्हिटॅमिन डी सर्दी सारख्या श्वसन संक्रमणांना देखील दूर ठेवते. दररोज व्हिटॅमिन डीची सप्लिमेंट घेतल्याने दम्याचा तीव्र झटका येण्याचा धोकाही कमी होतो. म्हणून, दही, संत्र्याचा रस, सॅल्मन आणि ट्यूना सारखे मासे, मशरूम, अंड्यातील पिवळा बलक, चीज आणि व्हिटॅमिन डीने परिपूर्ण असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे.

2. ताजी फळे आणि पालेभाज्या

फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा सकस आहार ठेवल्यास दम्याच्या समस्येला आळा घालता येतो. ताजी फळे आणि भाज्यांचे अधिक सेवन केल्यास लहान मुलांमध्ये तसेच प्रौढांना दम्याचा आजार होण्याचा धोका कमी होतो. सफरचंद, केळी अशी काही फळे आहेत जी अस्थमाच्या रुग्णांनी जरूर खावीत. गाजर, पालक, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली आणि रताळे यांचा अवश्‍य आहारात समावेश असावा.

3. मॅग्नेशियमयुक्त पदार्थ

एका अभ्यासानुसार, 11 ते 18 वयोगटातील पौगंडावस्थेतील मुले ज्यांच्या शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते त्यांना दमा, फुफ्फुसाचा आजार होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यासाठी पालक, भोपळ्याच्या बिया, डार्क चॉकलेट, सॅल्मन फिश इत्यादींचे सेवन करू शकता. त्यात मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम असते. .

4. संपूर्ण धान्य

ओट्स, गव्हाचे पीठ, लापशी, संपूर्ण गव्हापासून तयार झालेले अन्न खायला हरकत नाही. 2013 च्या एका अभ्यासानुसार, जे मुले आणि किशोरवयीन मुले आठवड्यातून 3 पेक्षा जास्त वेळा फास्टफूडचे सेवन करतात त्यांना अस्थमाची गंभीर लक्षणे दिसतात. संपूर्ण गव्हापासून बनवलेला पास्ता आदी संपूर्ण धान्य दम्याची लक्षणे कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

या गोष्टींना टाळा

1. सल्फाइट्स असलेले पदार्थ

‘सल्फाईट’ हा एक प्रकारचा ‘प्रिझर्वेटिव्ह’ आहे जो अल्कोहोल, लोणचं, बाटलीबंद लिंबाचा रस आणि ड्रायफ्रुट्स यांसारख्या गोष्टींमध्ये मिसळला जातो, यामुळे हे अन्नघटक लवकर खराब होत नाही जास्त काळ टिकतात. रुग्णांनी सल्फाईट्स असलेल्या अधिक गोष्टींचे सेवन केल्यास, केवळ त्यांच्या दम्याची लक्षणेच वाढत नाही, तर त्यांना दम्याचा झटका देखील येऊ शकतो.

गॅस निर्माण करणारे घटक

दम्याच्या रुग्णांनी एकाच वेळी भरपूर अन्न खाल्ल्यास किंवा पोटात गॅस निर्माण करणारे पदार्थ खाल्ल्यास ‘डायफ्राम’वर दबाव वाढतो, ज्यामुळे छातीत दाब आल्यासारखे जाणवते यातून दम्याचा झटकादेखील येउ शकतो. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांनी बीन्स, कोबी, कार्बोनेटेड पेये, कांदे, लसूण आणि जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

इतर बातम्या

उगच का व्यायामाला महत्व आहे… चमत्कारी फायद्यांसह या आजारांपासून रहा दूर

रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचे सेवन टाळा; अन्यथा करावा लागेल लठ्ठपणाचा सामना

सिगरेट आणि दारुचे व्यसन पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त घातक; गर्भाशयाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.