आधी मोफत लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी

केवळ दिल्लीतीलच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेाल कोरोनाची मोफत लस देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अवघ्या अर्ध्या तासातच घुमजाव केलं आहे. (Don't believe in rumours against vaccine says Dr. Harsh Vardhan)

आधी मोफत लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 1:25 PM

नवी दिल्ली: केवळ दिल्लीतीलच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेाल कोरोनाची मोफत लस देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अवघ्या अर्ध्या तासातच घुमजाव केलं आहे. काही ठरावीक लोकांनाच कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याचं ट्विट डॉ. हर्षवर्धन यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Don’t believe in rumours against vaccine says Dr. Harsh Vardhan)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाची लस किती टप्प्यात वितरीत केली जाईल याची माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना कोरोनाची लस मोफत दिली जाईल. त्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोनन कोटी फ्रंटलाईन वर्करचा समावेश असेल. प्राथमिकता यादीतील इतर 27 कोटी लोकांना जुलैपर्यंत लस देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असं हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनाची लस आल्या आल्या सामान्य लोकांना ही लस मोफत मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

काय म्हणाले होते हर्षवर्धन?

डॉ. हर्षवर्धन आज सकाळी गुरु तेग बहादूर सिंग रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना कोरोनाची लस दिल्लीतील जनतेलाच मोफत मिळणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण भारतातील जनतेला ही लस मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. चार राज्यात लसीकरणाबाबतचं ड्राय रन घेण्यात आलं असून त्याचा फिडबॅक मिळाला आहे. लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या होत्या. त्यात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज ड्राय रन घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हे ड्राय रन सुरू असून यावेळी नियमांचं पालन केलं जात आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. (Don’t believe in rumours against vaccine says Dr. Harsh Vardhan)

लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. व्हॅक्सीन सुरक्षित ठेवण्यावर आमचा भर आहे. पोलिओ लसीकरणाच्यावेळी अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. तरीही लोकांनी लस टोचून घेतली आणि भारत पोलिओमुक्त झाला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. देशाला लसीकरणाचा अनुभव आहे. कोरोनाची लस जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. पण अवघ्या अर्धा तासातच हर्षवर्धन यांनी पलटी खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Don’t believe in rumours against vaccine says Dr. Harsh Vardhan)

संबंधित बातम्या:

जालन्यात कोरोना लसीकरणाची ड्राय रन सुरु, आरोग्यमंत्री टोपेंकडून संपूर्ण कार्यपद्धती समजून घ्या

कोव्हिशिल्ड लसीचे किती डोस तयार, तुम्हाला कशी आणि किती रुपयात मिळणार?

कोरोनाची लस संपूर्ण देशवासियांना मोफत मिळणार; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

(Don’t believe in rumours against vaccine says Dr. Harsh Vardhan)

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.