रोज सकाळी एक कप धन्याचे पाणी प्या; ‘या’ आजारांपासून दूर रहा
जवळपास सर्वच भारतीय पदार्थांमध्ये धन्याचा (Coriander) वापर केला जातो. धने हे भारतामधील लोकप्रीय मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक आहे. धन्यामुळे केवळ पदार्थच स्वादिष्ट बनत नाहीत. तर धन्यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्यामुळेच तर आहार तज्ज्ञांकडून धन्याचे (Coriander Water) पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
जवळपास सर्वच भारतीय पदार्थांमध्ये धन्याचा (Coriander) वापर केला जातो. धने हे भारतामधील लोकप्रीय मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक आहे. धन्यामुळे केवळ पदार्थच स्वादिष्ट बनत नाहीत. तर धन्यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्यामुळेच तर आहार तज्ज्ञांकडून धन्याचे (Coriander Water) पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. धन्याचे पाणी बनवण्यासाठी रात्री एक कप पाण्यामध्ये एक चमचा धने भिजत घाला. सकाळी या पाण्याला गाळून घ्या. त्यानंतर तुम्ही हे पाणी पेऊ शकता. धन्यांच्या पाण्यामध्ये (Benefits Of Dhaniya Water) मोठ्याप्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियमचा साठा असतो. तसेच धन्यामधील इतर पोषक तत्वे देखील तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवता. म्हणूनच अनेक भारतीय पदार्थांमध्ये धन्याचा वापर केला जातो. आज आपन धन्याचे विविध उपयोग जाणून घेणार आहोत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
धन्याच्या पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅगन्शियमचा साठा असतो. हे पोषक तत्वे तुम्हाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात. धन्याचे पाणी रोज सकाळी पिणे आरोग्यदायी असते. धन्याचे पाणी पिल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच धन्याचे पाणी पिल्यास तुमचे शरीर देखील तंरुस्त राहाते.
वजन कमी होते
धन्याच्या पाण्यामध्ये असे देखील काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमची पचन शक्ती वाढते. सोबतच तुमच्या शरीरातील मेटाबॉल्जिम देखील वाढते. यामुळे तुमचे वजन अवघ्या काही दिवसांत कमी होऊ शकते.
तोंड येण्याच्या समस्येवर गुणकारी
तुमच्या शरीरात अधिक उष्णता असेल, आणि त्यामुळे जर तुम्हाला सातत्याने तोंडात फोड येत असतील, तर त्यावर देखील धने रामबाण इलाज आहे. धन्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास तुमच्या शरीरामधील उष्णता कमी होते. परिणामी उष्णतेपासून निर्माण होणाऱ्या समस्येतून तुम्हाला सुटका मिळते.
कॉलेस्ट्रोलपासून सुटका
विविध पदार्थ्यांच्या सेवनामुळे शरीरात कॉलेस्ट्रोल वाढू शकते. कॉलेस्ट्रोलमुळे तुम्हाला विविध आजार होऊ शकतात. तुम्ही रोज रात्री धने भिजत घालून, सकाळी ते पाणी पिल्यास तुमच्या शरीरातील कॉलेस्ट्रोलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
टीप : वरील सर्व माहिती ही सामान्य ज्ञानाच्या हेतून लिहिण्यात आली आहे. तुम्ही तुमचा डायट प्लॅन ठरवताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.
संबंधित बातम्या
ही दुखणं सांगतात तुम्हाला थंडी बाधली…त्यामुळे घ्या काळजी कारण मुंबईत अचानक थंडी वाढली…
Covid-19: बापरे! संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना कोरोनाची लागण