Dry Fruits For Sharp Mind : ‘हे’ ड्रायफ्रुट्स खाऊन मेंदू होईल शार्प, मुलांच्या आहारात जरूर करा समावेश
सुका मेवा हा पोषक तत्वांनी समृद्ध असतो, त्याचे सेवन केल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते. तसेच स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते.
नवी दिल्ली: सुका मेवा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशयय चांगला व फायदेशीर मानला जातो. मेंदूच्या आरोग्यासाठीही सुका मेव्याचे (Dry Fruits) सेवन करणे उपयुक्त ठरते. आपल्या जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी (Quality life) सुका मेवा प्रभावी ठरतो. त्यांचे सेवन केल्याने लक्ष एकाग्र करणे, स्मरणशक्ती वाढवणे आणि बुद्धी अथवा मेंदू तीक्ष्ण होण्यास (Sharp Mind) मदत मिळते. लहान मुलं असोत किंवा मोठ्या व्यक्ती, प्रत्येक व्यक्तीला सुका मेवा सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. स्मरणशक्ती चांगली व्हावी आणि तीक्ष्ण मेंदूसाठी कोणत्या प्रकारच्या सुका मेव्याचे सेवन केले पाहिजे, हे जाणून घेऊया.
बदाम
बदामामध्ये फॅट- सोल्यूबल व्हिटॅमिन एकदम योग्य प्रमाणात असतात. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन ई हेही मुबलक प्रमाणात असते, जे वाढत्या वयानुसार कमकुवत होणारी स्मरणशक्ती सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. बदाम तुम्ही साध्या स्वरुपात खाऊ शकता किंवा ते भिजवून, त्यानंतर साल काढूनही त्याचे सेवन तुम्ही करू शकता. बदामम भाजून खाल्यासही चविष्ट लागतात. त्याशिवाय बदाम घातलेले दूध प्यायल्यानेही फायदा होतो.
अक्रोड
मेंदूसाठी फायदेशीर पदार्थांबाबत बोलायचे झाले, तर त्यामध्ये अक्रोडचा नंबर सर्वात पहिला लागतो. अक्रोड हा दिसायलाही मेंदूसारखा असतो आणि तो मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. अक्रोडमध्ये पोलीफेनोल्स, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा -3 फॅटी ॲसिड्स आढळतात.
या सुक्या मेव्याचा मेंदूवर होणाऱ्या परिणामाबद्दल बोलायचे झाले तर अक्रोडचे सेवन हे मेंदूसाठी अतिशय फायदेशीर ठरते. अक्रोड हा (आपली) शिकण्याची क्षमता वाढवतो आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी तसेच चिंता कमी करण्यात प्रभावी ठरतो. अक्रोड हे स्नॅक म्हणनूही खाल्ले जाऊ शकते. तसेच स्मूदीमध्येही त्याचा वापर करता येतो. अथवा सॅलॅड किंवा टोस्टवर लावूनही अक्रोडचे सेवन करता येते.
भुईमूग
स्वस्त पण आरोग्यासाठी इतर कोणत्याही महागड्या पदार्थाइतकेच उत्तम असलेले भुईमूग (शेंगदाणे) हे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. विशेषत: थंडीच्या दिवसांत रस्त्यां-रस्त्यावर मिळमारे भाजलेले शेंगदाणे खाण्याचीमजा काही औरच असते.
भुईमूगाला ब्रेन फूडचा दर्जा देण्यात आला आहे, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन बी-3 आणि व्हिटॅमिन पीपी हे आढळते, जे न्यूरोनल डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त असते. त्याशिवाय भुईमूग अथवा शेंगदाणे हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरते.