बाप्पाला अर्पण केलेले लाडू खाण्याचे फायदे काय?; वाचा एक्सपर्ट काय सांगतात
सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम आहे. काही लोक घरात दीड दिवसाच्या, काही लोक तीन तर काही पाच आणि काही लोक दहा दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना करतात. (health benefits of laddu doctor said bad news if you are avoiding it)
मुंबई: सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम आहे. काही लोक घरात दीड दिवसाच्या, काही लोक तीन तर काही पाच आणि काही लोक दहा दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना करतात. यावेळी बाप्पाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात. मात्र, काही लोक लाडू खाण्यास टाळाटाळ करतात. लाडू खाल्ल्याने वजन वाढेल किंवा शुगर लेव्हलमध्ये गडबड होईल असं त्यांना वाटतं. (health benefits of laddu doctor said bad news if you are avoiding it)
लाडू किंवा मोदक खाणं काही लोक आरोग्याच्या कारणास्तव टाळत असले तरी हेल्थ एक्सपर्ट आणि डायटिशियन मात्र लाडूचा प्रसाद खाण्याचा सल्ला देतात. प्रसिद्ध डायटिशियन रुजुता दिवेकर यांनी लाडू खाण्याचा सल्ला दिला आहे. एका डॉक्टरनेही लाडू खाण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टर सुचिता भानुशाली यांनीही लाडू खाण्याबाबतची एक सकारात्मक पोस्ट केली आहे. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
लाडूचा प्रसाद नाकारू नका
डॉक्टर सुचिता भानुशाली यांनी लाडू बनवतानाची एक पोस्ट शेअर केली आहे. गणेश उत्सवात मिठाई, लाडू हे माझे आवडते खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे मी सकाळी नाश्त्यामध्येही लाडू खात असते, असं भानुशाली सांगतात. त्यामुळे आहारात लाडू घेणं हानिकारक नसल्याचं पोस्टवरून स्पष्ट होतं. त्यामुळे प्रसाद म्हणून देण्यात येणारा लाडू नाकारू नका.
प्रसाद म्हणून खा
जर तुम्ही लाडू खाणं टाळत असले तरी तुमच्या शरीराला त्याचा काही फायदा होणार नाही, असं भानुशाली सांगतात. म्हणजे एखादा लाडू खाल्ल्यास त्याने आरोग्यावर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे प्रसादासारखा लाडू खाणं वाईट नाहीये.
हाडे मजबूत होतात
इतर भोजनासोबत मिठाईचा अस्वाद घेतल्यास पोषक तत्व वाढतील. लाडू खाल्ल्याने हाडांच्या पेशी मजबूत होतात आणि त्याला आवश्यक न्यूट्रिशनचा पुरवठा करतात. कारण लाडूमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, व्हिटामिन ए, डी, ई आणि के आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं.
लाडू खाण्याचा फायदा
लाडूचे पोषक तत्त्व डोक्यापासून प्रतिरक्षा प्रणाली पर्यंत शरीरातील कार्यांसाठी आवश्यक आहेत. ते एकप्रकारचे हिट देणारे अन्नच आहे. त्यामुळे शरीरातील तापमान कमी झाल्यास त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. लाडू खाल्ल्याने शरीरातील सर्व वेदना कमी होतात. परंतु, जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने लाडू बनवता आणि कमी प्रमाणात त्याचं सेवन करता तेव्हाच ते शरीरासाठी उपयोगी आहे, हे कायम लक्षात ठेवा. (health benefits of laddu doctor said bad news if you are avoiding it)
VIDEO : superfast 5050 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 12 September 2021https://t.co/hD9qbeCpY5 | #uddhavThackeray | #sanjayRaut | #Nashik | #Mumbai | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2021
संबंधित बातम्या:
तिशीनंतर महिलांच्या शरीरातील कॅल्शियम का कमी होते?; वाचा लक्षणे आणि कारणे!
Health Tips: यकृताची कार्यक्षमता वाढवा, नैसर्गिक पद्धतीने कशी घ्याल काळजी; आहारात काय असावं?, वाचा!
(health benefits of laddu doctor said bad news if you are avoiding it)