Symptoms of High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्याच्या खुणा डोळ्यांवरही दिसतात? जाणून घ्या लक्षणं

जर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोल लेव्हल वाढली असेल तर याची काही लक्षणे आपल्या डोळ्यांवर सुद्धा दिसून येतात. ही लक्षणे नेमकी कोणकोणती आहेत आणि यामुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावर कोणते विपरीत परिणाम पाहायला मिळतात ? याबद्दल जाणून घेऊया..

Symptoms of High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्याच्या खुणा डोळ्यांवरही दिसतात? जाणून घ्या लक्षणं
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 7:25 AM

Symptoms of High Cholesterol: मानवी जीवन धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे. या जीवनामध्ये मनुष्याला अनेक समस्या वारंवार त्रास देत आहे त्यातील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची (cholesterol level) वाढलेली मात्रा अशावेळी हाय कोलेस्ट्रॉल किंवा हायपर कोलेस्ट्रोलेमियाची समस्याआपल्या सगळ्यांसाठी नवीन नाही. हल्ली प्रत्येकाच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची वाढलेली मात्रा सगळ्यांना सतावत आहे. आपणास सांगू इच्छितो की ,कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणारा एक पदार्थ आहे, जो आपल्या शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतो. ज्यामुळे आपल्याला हृदयासंदर्भातील अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. हायपर कोलेस्ट्रोलेमियाला लिपिड डिसऑर्डर किंवा हायपर लिपिडिमिया या नावाने देखील ओळखले जाते तसेच हाय कोलेस्ट्रॉलमुळे आपल्या डोळ्यांना नेमक्या काय काय समस्या उद्भवतात व त्याची नेमकी लक्षणे (symptoms) काय आहेत, चला तर मग सविस्तरपणे जाणून घेवूया सगळ्या गोष्टींबद्दल.

हाय कोलेस्ट्रॉलचे सामान्य लक्षण

तुमच्या शरीरामध्ये जर कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढलेला असेल तर अश्या वेळी आपल्याला काही लक्षण जाणवून येतात. जसे की मळमळ ,अशक्तपणा, थकवा जाणवणे,हाय बीपी ,श्वास घेण्यात अडथळा निर्माण होणे, छातीमध्ये दुखणे किंवा एक्झिमा यासारख्या समस्या त्रास देऊ लागतात. जर आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढू लागले असेल तर सुरुवातीला याबद्दल आपल्याला काहीच कळत नाही परंतु जसे जसे शरीरामध्ये बदल घडू लागतात त्या पद्धतीने याची लक्षणे जाणवतात आणि म्हणूनच जर तुम्हाला काही लक्षणे जाणवली तर याकडे दुर्लक्ष न करता योग्य तो उपचार करणे गरजेचे आहे.

डोळ्यांवर दिसणारी लक्षणे

​रिपोर्ट नुसार जेव्हा व्यक्तीच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा अधिक वाढते या दरम्यान आपल्या डोळ्यांमध्ये काही बदल झालेले पाहायला मिळतात, अनेकदा हे सगळे बदल कोलेस्ट्रॉल शी निगडित असतात असे सुद्धा नसते. जर तुमच्या डोळ्यांमध्ये काही बदल जाणवत असेल तर अशावेळी डॉक्टरांना अवश्य भेट द्यायला हवी.

आपणास सांगू इच्छितो की, हाय कोलेस्ट्रॉल दरम्यान डोळ्यांवरील वरच्या पापणीच्या आजुबाजूला पांढरे आणि पिवळ्या रंगाचे ठिपके आपल्याला पाहायला मिळतात तसे पाहायला गेले तर असे काही लक्षणे अन्य आजारांमध्ये सुद्धा उद्भवतात परंतु अधिक तर ही लक्षणे आपल्याला हायपरलिपिडिमिया या आजारात दिसून येतात. अश्या प्रकारचे निशाण सर्वसाधारणपणे सौम्य पद्धतीचे असतात.

कॉर्नियल आर्कस सुद्धा हाय कोलेस्ट्रॉलचे एक लक्षण आहे. आपणास सांगू इच्छितो की,अश्या वेळी आपल्या डोळ्याच्‍या बुबुळाच्या आजूबाजूला पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे ठिपके आढळून येतात. जर तुमचे वय पन्नास पेक्षा कमी असेल आणि अशा वेळी तुम्हाला अशा प्रकारचे काही लक्षणे डोळ्यांच्या अवतीभोवती आढळून आले तर समजुन जा की हायपर कोलेस्ट्रोलेमियाचे लक्षण आहेत.

​भारतामध्ये कोलेस्ट्रॉलच्या वाढणाऱ्या समस्या

जाणून हैराण व्हाल की, भारतामध्ये प्रत्येक वर्षी हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही संख्या 1 कोटीच्या घरामध्ये पाहायला मिळते. याशिवाय 2017 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार भारतामध्ये कोलेस्ट्रॉल रुग्ण 25 ते 30 टक्के शहरांमध्ये आणि 15 ते 20 टक्के ग्रामीण भागामध्ये आढळून आले आहेत तसेच भारतामध्ये कोलेस्ट्रॉलशी निगडित असणाऱ्या अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे यामध्ये कोलेस्ट्रॉलचे वेगवेगळे प्रकार सुद्धा प्रामुख्याने आढळून आलेले आहेत,जसे की डिस्लिपिडेमिया बॉर्डर लाइन, हाय लो डेंसिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल, हाय लो डेंसिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्राइग्लिसराइड्स इत्यादी प्रकारांचा समावेश आहे.

​कोलेस्ट्रॉलची भूमिका

कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातील अनेक महत्त्वपूर्ण कार्य पार पाडत असतो. आपणास सांगू इच्छितो की, कोलेस्ट्रॉलच्या मदतीने सेल मेंब्रेनचे स्ट्रक्चर तयार केले जाते त्याच्या माध्यमातून एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरोन आणि एड्रिनल हार्मोन ची निर्मिती केली जाते त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम रेट वाढवतो सोबतच आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करत असतो त्यांचे पचन देखील सहज होते त्याचबरोबर विटामिन डीच्या निर्मितीसाठी कोलेस्ट्रॉल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो .कोलेस्ट्रॉलमध्ये कमी घनत्व असणारे लिपोप्रोटीन, उच्च घनत्ववाले लिपोप्रोटीन आणि ट्राइग्लिसराइड उपलब्ध असतात.

शरीरासाठी ठरू शकते कोलेस्ट्रॉल घातक

​जेव्हा शरीरामध्ये मर्यादेपेक्षा कोलेस्टरॉल ची लेव्हल वाढते तेव्हा कोलेस्ट्रॉल मानवी शरीरासाठी धोकादायक ठरतो आणि अशा वेळी अनेक समस्या आपल्याला उद्भवतात. आपल्या सांगू इच्छितो की आपल्या शरीरासाठी 200 मिलीग्राम प्रति डेसीलीटर पेक्षा कमी कोलेस्ट्रॉल सामान्य स्वरूपामध्ये मानले जाते. एका पुरुषासाठी गुड कोलेस्टरॉल किंवा एचडीएल कोलेस्ट्रॉलची लेव्हल 40 असते तर महिलांच्या बाबतीत ही लेव्हल 50 असते त्याचबरोबर बॅड कोलेस्टेरॉल किंवा एलडीएल कोलेस्ट्रॉल 100 पेक्षा कमी नसावी.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे. तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार किंवा सल्ला देत नाही. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असल्यास घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या :

Health Tips : कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ही पेये प्या, आजारांपासून दूर राहाल!

कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आहारात या मसाल्यांचा समावेश करा!

Green Garlic : हिरवा लसूण फायदेशीर औषधी गुणांनी परिपूर्ण, जाणून घ्या त्याचे फायदे

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.