Health tips : मज्जातंतूच्या वेदनांवर ‘हे’ घरगुती उपाय आहेत रामबाण इलाज

मज्जातंतूमध्ये (Pain in Nervous system) वेदना होणे ही एक सामान्य बाब आहे. बऱ्याचवेळेला खराब लाईफस्टाईलमुळे (Lifestyle) मज्जातंतूच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मज्जातंतू संबंधित समस्या निर्माण होण्याचे अनेक कारणे आहेत, आज आपन मज्जातंतूशी संबंधित आजारावरील काही घरगुती उपयांबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Health tips : मज्जातंतूच्या वेदनांवर 'हे' घरगुती उपाय आहेत रामबाण इलाज
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 10:53 PM

मज्जातंतूमध्ये (Pain in Nervous system) वेदना होणे ही एक सामान्य बाब आहे. बऱ्याचवेळेला खराब लाईफस्टाईलमुळे (Lifestyle)मज्जातंतूच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मज्जातंतू संबंधित समस्या निर्माण होण्याचे अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये डोक्याला, पाठीच्या मनक्याला अथवा मज्जातंतूला एखाद्या अपघातामुळे झालेली गंभीर इजा, अत्याधिक प्रमाणात दारूचे सेवन करणे, एखाद्या औषधाचाअतिरेक, व्हिटॅमिन बी 12 किंवा बी 1 ची कमतरता, मज्जातंतूच्या रक्त पुरवठ्यात अडथळे, मधुमेह किंवा एखादा आजार अशा अनेक कारणांमुळे तुम्हाला मज्जातंतूशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. मज्जातंतूशी संबंधित काही समस्या निर्माण झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणेच आवश्यक आहे. मात्र जर मज्जातंतूशी संबंधित समस्या गंभीर नसेल तर तुम्ही अशा आजारांवर घरगुती उपाय (Home Remedies)देखील करू शकता. आज आपण अशाच काही घरगुती उपयांची माहिती जाणून घेणार आहोत. जे उपाय मज्जातंतूच्या समस्या दूर करण्यास अत्यंत उपयोगी आहेत.

काळे मीठ : तुम्हाला जर मज्जातंतूशी संबंधित काही समस्या असतील तर यावरील उपचारामध्ये काळे मीठ फायदेशीर ठरते. काळ्या मीठात मॅग्नेशियम मोठ्याप्रमाणात असते. अंघोळीच्या पाण्यात अंदाजे दोन कप काळे मीठ टाका. ते पाण्यात चांगल्या प्रकारे विरघळू द्या. त्यानंतर या पाण्याने आंघोळ करा किंवा ज्या भागात दुखत आहे, त्या भागावर हे काळे मीठ मिश्रीत पाणी टाका यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.

हळदीचा आहारात समावेश करा : हळदीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदामध्ये हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध आजारांवरील उपचारात हळदीचा उपयोग केला जातो. हळदीत अँटी -इफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. जे वेदना कमी करण्याचे काम करतात. मज्जातंतूशी संबंधित समस्या असेल तर हळदीचा आहारात समावेश करा. एका ग्लासात दूध घेऊन त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाका, त्यानंतर हे दूध गरम करा व प्या. असे दूध नियमित पिल्यास काही दिवसानंतर वेदना कमी झाल्याचे जाणवेल.

सफरचंदाचे ज्यूस : असे म्हणतात रोज एका सफरचंदाचे सेवन करा आणि डॉक्टरांपासून दूर रहा. सफरचंद हे सर्वच आजारांवर प्रभावी आहे. सफरचंदामध्ये मोठ्या प्रमााणात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. ज्याची तुमच्या शरीराला आवश्यकता असते. ज्या रुग्णांना मज्जातंतूशी संबंधीत काही समस्या असेल, अशा रुग्णांना सफरचंदाचे ज्यूस पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. यामुळे मज्जातंतूशी संबंधित वेदना कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या

दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू इच्छिता? तर मग या सवयी आजच सोडा, होऊ शकते मोठे नुकसान

चेहऱ्यावरील निशाणाला ब्यूटी मार्क समजत होती “ही” महिला, पुढे जे घडले ते सर्वांना थक्क करणारे होते !

वजन कमी करायचंय?, तर ‘या’ पदार्थांसोबत करा कोरफडीचे सेवन

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.