AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Night Skinacare: चमकदार त्वचेसाठी रात्री चेहऱ्यावर ‘या’ तेलाचा वापर, पिंपल्स आणि पिग्मेंटेशनच्या समस्या होतील छुमंतर….

Face Oil Benefits: निरोगी आणि हायड्रेटेड त्वचेसाठी त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे त्वचेकडे लक्ष देता येत नाही. परंतु आता घरच्या घरी अदगी कमी खर्चामध्ये तुमची चमकदार आणि निस्तेज त्वचा मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया निरोगी त्वचेसाठी फेस ऑईल कसे फायदेशीर ठरते.

Night Skinacare: चमकदार त्वचेसाठी रात्री चेहऱ्यावर 'या' तेलाचा वापर, पिंपल्स आणि पिग्मेंटेशनच्या समस्या होतील छुमंतर....
| Edited By: | Updated on: Feb 19, 2025 | 4:03 PM
Share

प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. चमकदार त्वचेसाठी अनेक स्किन केअर टिप्स फॉलो केल्या जातात. परंतु, वातावरणातील बदलामुळे चेहरा खराब होण्याची शक्यता असते. सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळपट आणि लालसर होते. सूर्यप्रकाशामुळे आजकाल टॅनिंगची समस्या अनेकांमध्ये पाहायला मिळते. त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर ती कोरडी होते. त्वचवरील चमक कायम ठेवण्यासाठी त्यामध्ये हायड्रेशन असणे गरजेचे असते. त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक क्रिम्स उपलब्ध आहेत. परंतु या क्रिम्सच्या वापरामुळे तुमचा चेहरा खराब होऊ शकतो. क्रिम्समधील रसायनिक पदार्थांमुळे तुमचा चेहरा खराब होऊ शकतो.

त्वचेला नैसर्गिकरित्या मॉईश्चरायझ करण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी काही उपाय करू शकता. निरोगी आणि हायड्रेटेड त्वचेसाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पोषक आणि योग्य आहाराचा समावेश करावा. तुमच्या आहारामध्ये फळांचा योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते. लिंबाचा किंवा व्हिटॅमिन सीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे किंवचा व्हिटॅमिन सी सीरम्स चेहऱ्यावर लावल्यामुळे टॅनिंग आणि पिंपल्सच्या समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्याची योग्य काळजी नाही घेतल्यामुळे तुम्हाला पिंपल्स आणि पिग्मेंटेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात.

निरोगी त्वचेसाठी तुम्ही चेहऱ्यावर तेलानी मसाज करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि पिंपल्स सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी त्यावर फेस ऑईलचा वापर केला जातो. चेहऱ्यावर तेलानी मसाज केल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तेलामध्ये हेल्दी फॅटी अॅसिड्स असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते. चेहऱ्यावर तेलानी मसाज केल्यामुळे चेहरा उजळतो, त्यासोबतच त्यावरील मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानांपासून संरक्षण होते. चेहऱ्यावर नारळाच्या तेलानी मसाज केल्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे होतात. खोबरेल तेलाचा वापरामुळे चेहऱ्याला नैसर्गिक हायड्रेशन मिळते. परंतु मार्केटमध्ये काही असे ऑईल मिळतात ज्यांचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील कोलोजनची मात्रा वाढण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया खोबरेल तेला ऐवजी चेहऱ्यावर कोणते तेल वापरणे फायदेशीर ठरेल.

आर्गन ऑईल – निरोगी त्वचेसाठी त्याच्यावर आर्गन ऑईलचा वापर करू शकता. चेहऱ्यावर आर्गन ऑईलचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे होतात. आर्गन ऑईलमध्ये हेल्दी फॅटी अॅसिड्स असतात ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते. आर्गन ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई आणि लिनोलेनिक अ‍ॅसिड असते ज्यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होते.

जोजोबा ऑईल – जोजोबा ऑईलमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेला फायदे होतात. जोजोबा ऑईलने चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे पिंपल्सच्या समस्या दूर होण्यास मदत होते. जोजोबा ऑईलच्या वापरामुळे मुरूम आणि डागांच्या समस्या दूर करण्यास मदत होते. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जोजोबा तेलाचा वापर करणं टाळावे.

बदाम ऑईल – तुमच्या चेहऱ्यासाठी बदामाचे तेल अत्यंत फायदेशीर ठरते. बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन सी आणि फॅटी अॅसिड्स असतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदाम तेलानी ममसाज केल्यामुले त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यास मदत होते.

‘या’ गोष्टी नेमही लक्षात ठेवा :

तुमचा चेहरा तेलकट असेल तर चेहऱ्यावर मसाज ऑईलचा वापर टाळावे.

पिंपल्सच्या समस्या असल्यास हलक्या कोमट पाण्यानी चेहरा धुवा.

संवेदनशील त्वचेवर फेस ऑईलचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.

तुमच्या त्वचेवरील पिंपल्सच्या समस्या दूर करण्यासाठी कोरफड जेल फायदेशीर ठरते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.