Healthy Foods : या पदार्थांचे सेवन केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्यही सुधारते, जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ

सकस पदार्थ हे तुम्हाला निरोगीही ठेवतात आणि अनेक आजारांपासून तुमचे संरक्षणही करतात. त्यामुळे तुम्ही प्रथम बाहेरील खाणे बंद करुन तुमच्या स्वयपाक घरातील पदार्थांचा तुमच्या आहारात वापर करा. त्यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.

Healthy Foods : या पदार्थांचे सेवन केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्यही सुधारते, जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ
physical and mentally healthImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 6:24 PM

Healthy Foods : तुमच्या आहारात निरोगी अन्नाचा वापर करत असाल तर त्याचे तुम्हाला दुहेरी फायदे होतात. एक तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास याचा फायदा होतो. आज आम्ही तुम्हाला तिच माहिती सांगणार आहे. तर जाणून घेऊया तुमच्या शारीरिक (Physical) आणि मानसिक आरोग्यासाठी (Mental health) कोणत्या पदार्थांचा समावेश तुम्ही करु शकता. आपल्या आहारा असलेल्या अन्नाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो, त्यामुळे आरोग्याची काळजी घेऊन योग्य सकस पदार्थाचे (Healthy Foods) सेवन करणे गरजेचे असते.

सकस पदार्थ हे तुम्हाला निरोगीही ठेवतात आणि अनेक आजारांपासून तुमचे संरक्षणही करतात. त्यामुळे तुम्ही प्रथम बाहेरील खाणे बंद करुन तुमच्या स्वयपाक घरातील पदार्थांचा तुमच्या आहारात वापर करा. त्यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.

नाचणी

नाचणीचे पदार्थ खाणाऱ्यांच्या संख्येत आता प्रचंड वाढ झालेली आहे. कारण नाचणीमध्ये व्हिटॅमिन सी, बी, ई, लोह आणि कॅल्शियम हे घटक असतात. नाचणीचा फायदा म्हणजे तुमच्या केसांसाठीही होतो आणि त्वचेसाठीही होतो. त्यामुळे नाचणी आहारात वापरत असाल तर तुम्ही नाष्ट्यामध्ये नाचणीचा वापर करु शकता. तुमच्या नसांना आराम मिळतो आणि तुम्हाला शांत झोपही लागते.

गुळ

गुळाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो, पूर्वी लोक गुळाचा वापर फक्त सणसमारंभ असेल तरच करत होते, मात्र सध्या गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तुम्हाला गोड खाण्यासाठी साखर आवडत असेल तर त्याऐवजी तुम्ही गुळ खाण्याची सवय लावून घ्या. त्यामध्ये भरपूर घटक असतात. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे गुळाचा वापर अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये करू शकता. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच, ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत करते.

खजूर

खजूराचा जर तुमच्या आहारात वापर करत असाल तर त्यामध्ये पोटॅशियमसह फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनॉइड्स आणि फिनोलिक अॅसिड्ससारख्या अँटिऑक्सिडंट्स घटक भरपूर प्रमाणात असतात. अनेक मेंदू तज्ज्ञ मेंदूच्या आरोग्यासाठी खजूर चांगले असतात आणि ते खात राहा असा सल्ला देत असतात. संशोधनानुसार, खजूर स्मरणशक्ती सुधारते आणि अल्झायमर रोगाचा धोका कमी करते.

नारळ

आपल्या शरीराला सगळ्यात जास्त फायदा देणारे कोणता घटक असेल तर तो म्हणजे नारळ. नारळातील कोणताही घटक हा तुमच्या आरोग्यासाठी लाभदायकच असतो. नारळाचे पाणी, कच्चे नारळ आणि नारळाचे दूधाचे सेवन करुन त्याचा लाभ तुमच्या शरीराला घेऊ शकता. शरीरातील तणाव दूर करण्यासाठी नारळाचा वापर केला जातो.

ड्राय फ्रुटस्

तुम्ही जर मुठभर ड्राय फ्रुटस् पाण्यात भिजवून खात असाल तर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य नक्कीच चांगले राहते. काजूमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते. बदाम आणि अक्रोडमुळे मेंदूचे कार्य सुधारते. तर पिस्ता हे मेंदूचे कार्य आणि दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशी असते. निरोगी केस आणि त्वचा सुधारण्यासाठी मदत करते. शेंगदाणेही एक उत्तम स्नॅकिंग पर्याय आहे.

संबंधित बातम्या

Weight Loss Tips : तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुमच्या आहारात या फळांचा समावेश करा, आणि फायदे पाहा…

केवळ 30 दिवसांत 10 किलो वजन कमी करा… या टिप्स ठरतील प्रभावी

Constipation Remedies : बद्धकोष्ठतेमुळे हैराण आहात? तर मग ‘या’ पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.