हार्ट ॲटॅकच्या ‘ या ‘ लक्षणांना फ्ल्यू समजण्याची चूक करू नका…
हार्ट ॲटॅक येणे हे जीवघेणे ठरू शकते. बऱ्याच वेळेस लोकं हार्ट ॲटॅकच्या लक्षणांना फ्ल्यूची लक्षणे समजण्याची चूक करतात. व त्याकडे नीट लक्ष देत नाहीत. मात्र ही चूक महागात पडू शकते.
नवी दिल्ली: बऱ्याच वेळा लोकं हृदयविकाराच्या झटक्याची (हार्ट ॲटॅक) (heart attack) लक्षणे ही फ्ल्यूची लक्षणे (flu symptoms) म्हणून समजून घेण्याची चूक करतात. व त्याकडे नीट लक्ष देत नाहीत. मात्र ही चूक खूप महागात पडू शकते, घातकही ठरू शकते. तुम्हीही अशी चूक (do not neglect these symptoms) तर करत नाही ना ? अशाच काही लक्षणांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
थकवा: हृदयरोगाचा सामना करणाऱ्यांना अनेकदा शरीरात थकवा जाणवतो. हार्ट ॲटॅक आला की ताण येतो आणि पीडित व्यक्ती वेगाने थकायला लागते. फ्ल्यू असताना थकवा येणे स्वाभाविक असते, पण जर हा थकवा वेगाने वाढू लागला तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
श्वास घेण्यास त्रास होणे: फ्ल्यू झालेला असताना श्वास घेण्यास त्रास होतो, परंतु हे हार्ट ॲटॅक अथवा किंवा हृदयरोगाचेही लक्षण आहे. फ्ल्यू झाल्यावर छातीत दुखायला लागतं किंवा दम लागतो, पण जर तुम्हाला असं काही वाटू लागलं तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
चक्कर येणे: जेव्हा फ्ल्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीला चक्कर येऊ शकते, परंतु हे लक्षण हार्ट ॲटॅकशी संबंधितही आहे. केवळ फ्ल्यू मुळे असे होत आहे, असे वाटले तर घरीच उपचारही करता येतील, पण ते जर हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
घाम येणे: आजकाल टोमॅटो फ्ल्यू सारख्या अनेक संसर्गाची खूप चर्चा सुरू आहे. एखाद्या व्यक्तीला फ्ल्यू झाला असेल तर त्या व्यक्तीला तापामुळे बऱ्याच वेळेस घाम येतो. पण खूप घाम येणं हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा बीपी कमी होतं, तेव्हा घाम येणं सुरू होते आणि काही मिनिटांतच हृदयविकाराचा झटका येतो.