चेहऱ्यावर दिसतात हाय कोलेस्ट्रॉलची ‘ही’ 3 लक्षणं, करू नका दुर्लक्ष

हाय कोलेस्ट्रॉलमुळे केवळ आपले रक्ताभिसरण आणि रक्तदाब यावरच परिणाम होत नाही, तर शरीराच्या अनेक भागांवरही परिणाम होऊ शकतो.

चेहऱ्यावर दिसतात हाय कोलेस्ट्रॉलची 'ही' 3 लक्षणं, करू नका दुर्लक्ष
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 3:55 PM

नवी दिल्लीकोलेस्ट्रॉल (cholesterol) हे आपल्या शरीरातील अनेक प्रक्रियांसाठी महत्वाचे असते. हा एक असा फॅट सबस्टान्स आहे, ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य प्रमाणात राहणे गरजेचे असते. खरंतर कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात, एक चांगले कोलेस्टेरॉल (HDL)आणि दुसरे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल (LDL). चांगले कोलेस्ट्रॉल आपल्या हाडांसाठी कुशनसारखे कार्य करत असताना, खराब कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉक करण्याचे कार्य करते. खराब कोलेस्ट्रॉलमुळे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होऊन हाय ब्लड प्रेशर तसेच हृदयाशी संबंधित रोगांसाठी ते (खराब कोलेस्ट्रॉल) कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे (High cholesterol symptoms) सुरूवातीलाच ओळखून ते कमी करण्याचे उपाय केले पाहिजेत. हाय कोलेस्ट्रॉलची काही लक्षणे आपल्या चेहऱ्यावरही दिसू शकतात.

1) चेहऱ्यावर पिवळसर पुरळ येणे

बऱ्याच वेळा आपण पाहतो की, काही लोकांच्या चेहऱ्यावर पिवळ्या रंगाचे पुरळ येते. हे हाय कोलेस्ट्रॉलचे वाढल्याचे लक्षण आहे. खरंतर जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा रक्तवाहिन्या आणि चेहऱ्याच्या लहान नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण होते. त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो तसेच चेहऱ्यावरील छिद्रांमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. असते. यामुळे चेहऱ्यावर पिवळे-पिवळे पुरळ येते.

हे सुद्धा वाचा

2) खाज येणारे पुरळ

कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे आपल्याला खाज सुटणे पुरळांचा त्रास होऊ शकतो. खराब रक्ताभिसरण आणि बंद छिद्रे यामुळे हे पुरळ येऊ शकते. यामध्ये संपूर्ण शरीरावर लहान लाल फोड दिसू शकतात, जे शरीरभर पसरलेले असतात. म्हणून, शरीरावर विनाकारण अशा प्रकारचे पुरळ उठले असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवा.

3) त्वचेवरील मेणासारख्या गाठी

काही लोकांना त्यांची त्वचा जाड आणि मेणासारखी वाटू शकते. खरंतर हे हाय कोलेस्ट्रॉलमुळे होते. ज्यामुळे आपला चेहरा व त्वचा अशी दिसू लागते. म्हणूनच, त्वचेवरील हाय कोलेस्ट्रॉलच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित डॉक्टरांना दाखवा.

(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.