Exercise For Cholesterol: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा हे व्यायाम, मिळेल औषधांपेक्षाही जास्त फायदा

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएटसह व्यायामही अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावतो. 

Exercise For Cholesterol: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा हे व्यायाम, मिळेल औषधांपेक्षाही जास्त फायदा
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 12:28 PM

कोलेस्ट्रॉल ही एक अशी समस्या आहे, जी वाढल्यास मधुमेह आणि हृदय विकाराचा त्रास उद्बवू शकतो. वयानुसार कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढतं कारण वय वाढतं तसं त्या व्यक्तीची ॲक्टिव्हिटी म्हणजेच शारीरिक हालचाल आणि रोगप्रतिकारक शक्ती (immunity) हे कमी होत जाते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचे असेल तर आहार आणि व्यायाम (exercise), हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. विशेषत: लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या लोकांनी रोजच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश केला पाहिजे. कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असलेल्या लोकांनी हलक्या व्यायामाऐवजी उच्च तीव्रतेचा व्यायाम केला पाहिजे.

उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्यास अधिक प्रमाणात फॅट व कॅलरी बर्न होऊ शकतात. हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते व्यायाम केले पाहिजेत, त्याबद्दल जाणून घ्या.

जॉगिंग आणि रनिंग – धावणे आणि जॉगिंग करणे हा एक उत्तम व्यायाम आहे, ज्यामुळे कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होऊ शकते. एव्हरीडे हेल्थ नुसार, ज्या लोकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी जॉगिंग आणि धावणे यासारखे व्यायाम निवडले पाहिजेत. या व्यायामामध्ये रक्ताभिसरणाबरोबरच हृदयाचे ठोकेही वाढतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ३० मिनिटांच्या सेशनमध्ये 250 ते 300 कॅलरीज बर्न करता येतात.

हे सुद्धा वाचा

ॲरोबिक नृत्य – ज्या लोकांना नृत्याची आवड आहे ते ॲरोबिक नृत्याचा व्यायाम निवडू शकतात. या व्यायामामध्ये उच्च तीव्रतेच्या हालचाली असतात, ज्या एकसलग म्हणजेच न थांबता केल्या जातात. ॲरोबिक डान्सचा हा व्यायाम संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलसह लठ्ठपणा देखील कमी होऊ शकतो. हा व्यायाम 30 ते 45 मिनिटे करता येऊ शकतो.

दोरीवरच्या उड्या मारणे – लहानपणी आपण सर्वांनीच दोरीवरच्या उड्या मारल्या असतील. हा एक उच्च तीव्रतेचा व्यायाम आहे जो शरीराला मजबूत करण्यास तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतो. वय आणि क्षमतेनुसार त्याचा सेट निवडता येतो. दोरीवरच्या उड्या मारल्याने पायांचे स्नायू बळकट होतात तसेच हृदयाचे ठोकेही वाढतात, जे फॅट बर्न करण्याचे काम करतात.

सायकलिंग – सायकल चालवणे हे अनेक लोकांच्या नियमित दिनचर्येचा भाग बनला आहे. विशेषत: शहरात राहणारे लोक हे फिटनेससाठी सायकल चालवतात. सायकलिंग हाही एक उच्च तीव्रतेचा व्यायाम असून त्यामुळ कोलेस्ट्रॉल, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोग नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुमारे 30 मिनिटे सायकलिंग केले जाऊ शकते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.