काय गं डाएट करुनही तुझं वजन कमी होत नाही आहे, हे असू शकतं यांचं कारण…
वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम करतो अगदी डाएटही करतो. पण एका वेळेनंतर काही केलं तरी आपलं वजन कमी होत नाही. अशावेळी आपण निराश होतो. जर डाएट करुनही आपलं वजन कमी होत नाही आहे यामागे वेगळं कारण असू शकतं. आपल्या शरीरात हार्मोन्स हे अनेक बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हो, वजन कमी न होण्यामागेही हार्मोन्स असू शकतात.
वजन अचानक कमी होतेय किंवा अचानक वाढतंय असे अनेक जणांना समस्या असतात. कितीही डाएट करुनही वजन नियंत्रणात येत नाही. अशावेळी आपल्याला काही सूचत नाही. या सगळ्यामागे आपल्या शरीरातील हार्मोन्स कारणीभूत असू शकतात. महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून आली आहे. त्या वजन कमी करण्यासाठी अनेक गोष्टी करतात मात्र वजन कमी होत नाही. महिलांना याशिवाय अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. पीएमएस, मेनोपॉज, ताण आणि प्रेगनेंसी अशा अनेक वेळी त्यांचा शरीरात हार्मोन्स बदल होत असतात. या हार्मोन्स आणि वजनाचा काय संबंध आहे ते जाणून घेऊयात.
लेप्टिन हार्मोन्स
हा हार्मोन्स तुमच्या शरीरात तुमचं पोट भरलं आहे यांचे संकेत देतो. या हार्मोन्ससाठी तुमचं शरीर निरोगी असायला हवं. जर तुम्ही बाहेरचे पदार्थ खूप खात असाल तर हे हार्मोन्स काम करणं बंद करतं. मग बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या लिव्हर आणि पोटाभोवती चरबी जमा होते आणि तुमचं वजन वाढू लागतं.
इन्सुलिन हार्मोन्स
जर तुम्ही अनहेल्दी पदार्थांचं अतिरिक्त सेवन करत असाल तर तुमच्या शरीरात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढू लागते. आणि त्यामुळे तुमच्या पेशी इन्सुलिनला ब्लॉक करतात आणि तुमचं वजन वाढायला लागतं. एस्ट्रोजन हॉर्मोन
जर तुमच्या शरीरातील एस्ट्रोजनची पातळी कमी जास्त झाली तर तुमचं वजन झपाट्याने वाढतं. या हार्मोन्समुळे रक्तातील साखरेची पातळी वाढवतं.
कोर्टिसोल हार्मोन
हा हार्मोन्स म्हणजे तुम्ही जेव्हा तणावात असतात, तुम्हाला राग आलेला असतो किंवा तुम्ही निराश असाल तर तो अधिक वाढतो. आणि याचा परिणाम तुमच्या शरीरातील वजन वाढण्यास होतो.
प्रोजेस्टेरॉन हार्मोन
तुमच्या शरीराला निरोगी ठेवायचं असेल तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचं संतुलन गरजेचं आहे. हे संतुलन बिघडल्यास तुमचं वजन वाढतं. तसंच याचा दुसरा परिणाम म्हणजे तुम्ही डिप्रेशनमध्येही जाऊ शकतात.
टेस्टोस्टेरॉन हार्मोन
हा हार्मोन्स आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावतो. हा हार्मोन्स आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्याचं काम करतो. पण जर आपण तणावात असून अशावेळी हे हार्मोन्स काम करणं बंद करतं आणि परिणामी तुमचं वजन वाढतं.
इतर बातम्या-