या, रांगेत उभे राहा, ओळखपत्रं दाखवा, लस टोचून घ्या; निवडणुकीसारखं होणार लसीकरण

कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. (how do you get covid vaccine like election process)

या, रांगेत उभे राहा, ओळखपत्रं दाखवा, लस टोचून घ्या; निवडणुकीसारखं होणार लसीकरण
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 6:17 PM

नवी दिल्ली: कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे देशात या आठवडाभरात लसीकरण मोहीम सुरू होणार असून निवडणुकीतील मतदान प्रक्रियेसारखीच ही लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. (how do you get covid vaccine like election process)

मतदानासाठी ज्या प्रकारे तयारी केली जाते, अगदी तशीच तयारी लसीकरणासाठी करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी बुथ टाकण्यात येणार असून लोकांना रांगेत उभे करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचं ओळखपत्रं आणि त्यांची करण्यात आलेली नोंदणी पडताळून पाहण्यात येईल आणि मगच लस टोचली जाणार आहे. यासाठी सर्वच राज्यांनी तयारी केली आहे.

व्हॅक्सिनेशन बुथ

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी ज्या पद्धतीने निवडणूक कर्मचारी तैनात केले जातात, त्याच प्रमाणे लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी आणि अन्य कामगारांना कामाला लावण्यात येणार आहे. इलेक्शन बुथच्या धर्तीवर व्हॅक्सिनेशन बुथ तयार करण्यात येणार असून या बुथमध्ये हे आरोग्य कर्मचारी तैनात असणार आहेत. देशाला निवडणूक प्रक्रियेचा अनुभव असून त्याचा फायदा या लसीकरणावेळी होणार आहे. त्यामुळेच आधी ड्राय रन घेण्यात आली होती. ऐनवेळी काही गडबड होऊ नये यासाठी ही ड्राय रन घेण्यात आली होती. लसीकरण मोहिमेत कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये म्हणून खासगी डॉक्टरांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार असून त्यांच्याशी संपर्क साधला गेला आहे. या शिवाय या मोहिमेत प्राथमिक आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आदींचाही समावेश केला जाणार आहे.

बुथवर या, लस टोचून घ्या

एका रिपोर्टनुसार, व्हॅक्सिनेशन बुथवर दिवसाला किमान 100 लोकांना व्हॅक्सिन दिली जाणार आहे. व्हॅक्सिनसाठी कोविन अॅपवर अर्ज केल्यानंतर नाव नोंदणी होणार आहे. व्हॅक्सिनेशन बुथवर रांग लावल्यानंतर मतदान केंद्राप्रमाणे प्रक्रिया होणार आहे. लस टोचून घेण्यासाठी आलेल्या नोकरदारांना त्यांचं ओळखपत्रं दाखवावं लागणार आहे. यादीत त्यांच्या नावाचा समावेश असेल तर त्यांना व्हॅक्सिनेशन रुममध्ये प्रवेश दिला जाईल. व्हॅक्सिन टोचल्यानंतर किरकोळ साईड इफेक्ट्स जाणवू शकतात. पण त्याबाबतचीही तयारी करण्यात आली आहे.

अर्धा तास बसवून ठेवणार

कोरोनाची लस टोचल्याने किरकोळ साईड इफेक्ट्स जाणवू शकतात. त्यामुळे घाबरून जाऊ नये. लस दिलेल्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवलं जाणार आहे. ज्या व्यक्तिला लस टोचली त्याला व्हॅक्सिनेशन रुममध्ये अर्धा तास बसवून ठेवलं जाईल. त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास लगेच त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. देशातील एकूण 300 मेडिकल कॉलेज आणि स्पेशल हॉस्पिटलची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात देखरेख केंद्र तयार करणअयात आले आहेत. लहान मुलांना बीसीजीची लस टोचल्यानंतर हलका ताप जाणवतो. त्यामुळे त्याने फारसा त्रास होत नाही. तसेच कोरोनाची लस टोचल्यावर किरकोळ त्रास जाणवल्यास घाबरून जाऊ नये, असं कोरोना व्हॅक्सिनचे तज्ज्ञ डॉ. एन. के. अरोडा यांनी सांगितलं.

आधी लस कुणाला?

देशात सर्वात आधी देशातील 1 कोटी आरोग्य सेवक, 2 कोटी फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासह 50 हून अधिक वय असलेल्या 26 कोटी लोकांना कोरोनाची लस टोचली जाणार आहे. तसेच डायबिटीज, कँसर आदी गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या 50 पेक्षा कमी वयाच्या लोकांचीही यादी तयार करण्यात येत आहे. कोरोना लस जसजशी उपलब्ध होईल, तसतशी या लोकांना लस दिली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. काही दिवसानंतर सामान्य लोकांनाही या लसीकरणात सहभागी करून घेतलं जाणार आहे. (how do you get covid vaccine like election process)

संबंधित बातम्या:

आधी कोरोना त्यातच पुन्हा ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, ‘ही’ लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय मदत!

दिल्ली-मुंबईत मार्च-एप्रिलनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद; देशात कोरोनाला ब्रेक

रिकव्हर झाल्यानंतर मासिक पाळीवर परिणाम करतोय कोरोना, ‘या’ समस्यांनी महिला हैराण!

(how do you get covid vaccine like election process)

शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.