Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुर्वेदिक उपचारांनी खरंच उंची वाढू शकते का? डॉक्टरांनी सगळ्या शंकांच निरसन केलंय!

बाळांच्या वाढीचे मोजमाप म्हणजे उंची. उंची ही आपल्या वयानुसार वाढत असते .जर आपली उंची वाढत नसेल तर याला उंची खुंटणे असे म्हणतात. अनेक जण असे आहेत की त्यांची उंची वाढत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण आयुर्वेदिक उपचाराने आपली उंची कशी वाढवू शकते याबद्दल जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदिक उपचारांनी खरंच उंची वाढू शकते का? डॉक्टरांनी सगळ्या शंकांच निरसन केलंय!
आयुर्वेदिक उपचारांनी खरंच उंची वाढू शकते का?
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 8:30 PM

मुंबई : बाळाच्या वाढीचे मोजमाप म्हणजे उंची (height). उंची ही आपल्या वयानुसार वाढत जाते. जर आपली उंची योग्य वाढ योग्य प्रमाणामध्ये वाढत असेल तर त्याला आपण उंची असे म्हणतो आणि जर आपली उंची व्यवस्थित वाढत नसेल तर त्यालाच आपण उंची खुंटणे असे म्हणतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर प्रत्येक वेळेस वर्षी बाळाची उंची वाढतांना आपल्याला पाहायला मिळते. नैसर्गिक दृष्ट्या ही उंची वाढत असेल तर अत्यंत चांगले पण जर बाळाची उंची वाढत नेसेल तर अशा वेळी योग्य उपचार करून डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे म्हणूनच तुमच्या बाळाची (child health) सुद्धा उंची व्यवस्थित रित्या वाढत नसेल तर अशा वेळी आपण वेगवेगळे उपाय योजना करुन तसेच आयुर्वेदिक पद्धतीने सुद्धा उंची वाढवता येऊ शकते म्हणून आजच्या लेखामध्ये आपण आयुर्वेदिक (Ayurvedic treatment) दृष्टिकोनातून या उपचार पद्धतीत उंची कशा पद्धतीने वाढवायची याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत

टीव्ही 9 शी बातचीत करताना डॉ.आशिष गायकवाड यांनी सांगितले की , व्यक्तीच्या उंचीचा संबंध हा त्याच्या शरीराशी सुद्धा निगडित असतो शरीरामध्ये असणारी आवश्यक पोषकतत्व खनिज पदार्थ या सर्वांमुळे सुद्धा उंची वाढ विकसित होत असते आणि म्हणूनच जर आपल्या शरीरातील उंची वाढवायची असेल तर आपल्या शरीराला योग्य ते पोषक तत्व सुद्धा मिळणे गरजेचे आहे तसेच आपल्याला योग्य आहार पद्धती बाळगायला हवी.

उंची आणि व्यक्तिमत्व

डॉक्टर यांच्याशी बातचीत करताना त्यांनी सांगितले की, उंची आणि व्यक्तिमत्व यांचा एकमेकांशी संबंध आहे त्याच बरोबर जर आपली उंची व्यवस्थित असेल तर आपले व्यक्तिमत्त्व सुद्धा उठून दिसते तसेच अनेक असे वेगवेगळे क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामध्ये उंचीला खूप महत्त्व देण्यात आले आहे उदाहरणार्थ पोलीस भरती, आर्मी डिफेन्स यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये उंचीला विशेष महत्त्व दिले जाते. उंची वाढ ही खरेतर अनुवांशिकता यामुळे अवलंबून असते परंतु जर तुमची उंची जास्त असेल त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व सुद्धा खुलून दिसते आणि म्हणूनच अनेकदा आपल्या व्यक्तिमत्त्वाची सकारात्मक बाजू म्हणून सुद्धा उंचीकडे पाहिले जाते. ज्या पालकांना आपली मुलं भविष्यात पोलीस क्षेत्र ,आर्मी मिलिटरी , खेळाडू किंवा अनेक असे काही क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी उंचीला महत्त्व दिले जाते त्या ठिकाणी जर पाठवायचे असेल तर अशा वेळी उंचीवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

आनुवंशिकता आणि उंची

जेव्हा आपण अनुवंशिकता बद्दल बोलतो तेव्हा अनुवंशिकता म्हणजे काय तर आपले आई-वडील, भाऊ-बहीण ,आजी-आजोबा यांची जर उंची कमी असेल तर अशा वेळी येणारे बाळ असते किंवा जे पाल्य आहे त्याची उंची सुद्धा कमी असण्याची शक्यता असते परंतु जर आपण योग्य ते उपचार केले तर अशा वेळी त्या आधारावर सुद्धा आपण आपली उंची वाढवू शकतो आणि त्याचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगळे उपाय सांगण्यात आले आहेत

मुलींची उंची आणि मासिक पाळी

मुलींची मासिक पाळी आल्यावर उंची खुंटते हे विधान अगदी बरोबर आहे तसेच या विधानाला अनेक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे तसे पाहिले गेले. मुले व मुली त्यांच्या शरीरातील असलेली बदल यामुळे सुद्धा अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात तसेच कमी वयामध्ये मासिक पाळी आल्यामुळे गर्भाशय व इतर अवयवांच्या पोषण करण्यासाठी आणि पोषक तत्त्वांची आवश्यकता असते आणि परिणामी आपल्या शरीराची उंची वाढण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त असलेले घटक पदार्थ आपल्या उंचीला प्राप्त होत नाही अशा परिस्थितीत मुलींची वाढ खुंटते.

कमी वयात केलेला अतिरिक्त व्यायाम आणि उंची

साधारणतः वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत लहान मुलांना अतिरिक्त व्यायाम व वेटलिफ्टिंग सारखे शरीरावर ताण निर्माण होईल तसेच नाभी केंद्रावर परिणाम होईल अशा प्रकारचा कोणताही व्यायाम करू देऊ नका तसेच कोणत्याही प्रकारची शैली शिकत असताना जर जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला स्ट्रेचिंग करावी लागत असेल तर या गोष्टी सुद्धा आवर्जुन टाळाव्यात.

लक्षणं

अनेकदा आपल्या मुलांची उंची वाढत नसल्यामुळे पालक चिंता व्यक्त करत असतात परंतु अशा वेळी काही लक्षणे जर मुलांच्या बाबतीत दिसून आली तर ती लक्षणं जाणून घेणे अत्यंत गरजेचे ठरते, यासाठी आपल्याला आपल्या बाळांच्या उंचीची नोंद करून ठेवायची आहे आणि प्रत्येक वर्षांमध्ये बाळाची उंची किती प्रमाणामध्ये वाढत आहे याची तुलना सुद्धा करायची आहे.वयाच्या 6व्या वर्षापासून 14 व्या वर्षापर्यंत जर उंची वाढत नसेल , हाडांची समस्या उद्बवतील असतील तसेच हाड वाढ होत नसेल

उंची न वाढण्यामागील प्रमुख कारणे

अनुवांशिक्ता

गर्भधारणेच्या वेळी जर आईची प्रकृती खालावली असेल आणि वारंवार आजारी पडत असेल

ट्वीन प्रग्नेंसी,एकच गर्भात जर दोन बाळ असतील

रोग प्रतिकारक क्षमता कमी असल्यास

मुलींमध्ये मासिक पाळी कारणामुळे उंची खुंटते

आहार संतुलित नसेल

लहान मुलांची अपूर्ण झोप

उपचार

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले अनेक औषधी वनस्पतीचा वापर करून योग्य प्रमाणामध्ये फॉर्मुल्याच्या आधारावर विशेष औषधी वनस्पतींची निर्मिती करण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक वयोगटातील व्यक्तींवर व वयानुसार औषधांचे प्रमाण सुद्धा ठरवले गेलेले आहेत. उपचार पद्धती करतांना अनेक औषधी वनस्पतींचा वापर केला गेलेला आहे आणि त्यानुसार उपचार पद्धती ठरवण्यात आलेली आहे. नाडी परीक्षण प्रकृती परीक्ष नक्षत्र प्लॅन नुसार वेगवेगळे फॉर्म्युला पद्धत वापरून उपचार केले जातात

इतर बातम्या

योगा करण्याचा विचार करत आहात…पण कळतं नाही कुठले योगाचे प्रकार कराचे…मग जाणून घ्या एका क्लिकवर कुठला योगा तुमचासाठी आहे बेस्ट

रडूबाई…काय गं लगेचच कसं तुझ्या डोळ्यात पाणी येतं…

करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.