AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kids Health : मुलांमध्ये वाढत आहे डोळ्यांचा त्रास, पालकांनी फॉलो कराव्यात ‘या टिप्स

पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे डोळे कमकुवत होऊ शकतात. मुलांच्या आहारात व्हिटॅमिन ए, सी, ई आणि झिंक यांचा समावेश असला पाहिजे.

Kids Health : मुलांमध्ये वाढत आहे डोळ्यांचा त्रास, पालकांनी फॉलो कराव्यात 'या टिप्स
| Updated on: Oct 28, 2022 | 10:49 AM
Share

नवी दिल्ली – लहान मुलांना वेगवेगळी गॅझेट्स, फोन, टीव्ही आणि लॅपटॉपवर गेम्स (games on gadgets) खेळायला खूप आवडतात. मात्र स्क्रीनवर जास्त वेळ (screen time) घालवल्याने मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. मुलांची दृष्टी कमकुवत झाल्यास डोळ्यांमध्ये वेदना होणे (pain in eyes), अंधुक दिसणे आणि डोक्यात वेदना होणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. स्क्रीनवर सतत वेळ घालवल्याने लहान वयातच मुलांना चष्मा लागतो. टीव्ही किंवा मोबाईलवर जास्त वेळ घालवण्याची मुलांची सवय वेळीच सोडवली तर ही समस्या रोखण्यात यश मिळू शकते.

मुलांच्या आहाराची घ्या काळजी

आहारात पोषक तत्वांचा अभाव असेल तर आपली दृष्टी कमकुवत होऊ शकते. अशा परिस्थिती मुलांच्या आहारात व्हिटॅमिन ए, सी, ई आणि झिंक अँटी-ऑक्सीडेंट्स या पोषक तत्वांचा समावेश असला पाहिजे. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ओमेगा-3 फॅटी ॲसिडही खूप महत्वाचे असते. यासाठी तुम्ही मुलांच्या आहारात गाजर, ब्रोकोली, पालक, स्ट्रॉबेरी आणि रताळं यांचा समावेश करू शकता.

गॅझेट्सपासून ठेवा दूर

मुलांच्या डोळ्यांचे सर्वात जास्त नुकसान गॅझेट्समुळे होते. ही गॅझेट्स मुलांची दृष्टी कमकुवत करण्याचे कार्य करते. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना गॅझेट्सचा अतिवापर करण्यापासून रोखले पाहिजे. याकरिता मुलांसाठी थोडा वेळ राखून ठेवावा आणि त्यांच्यासोबत विविध माइंड गेम्स खेळावेत.

मुलांच्या डोळ्यांची करा तपासणी

डोळे हे आपल्या शरीराचा महत्वाचा आणि नाजूक अवयव आहेत. अशा परिस्थितीत वेळोवळी डोळ्यांची तपासणी करून घेत रहावी. त्यामुळे डोळ्याची काही समस्या उद्भवली तर त्याचे निदान वेळीच होईल आणि त्यावर उपचारही करता येतील. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, दर सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच पालकांनी त्यांच्या मुलांचे डोळेही तपासून घ्यावेत. त्याशिवाय मुलांच्या आहारात ए व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असावे.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.