जगभरात 3.5 अब्ज लोकांना तोंडाचे विकार, WHOचा आरोग्याबाबत इशारा

दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाच्या सुमारे 3,80,000 केसेसचे निदान केले जाते असे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे. तोंडाचा आजार असलेले तीन चतुर्थांश लोक हे कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील आहेत अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.

जगभरात 3.5 अब्ज लोकांना तोंडाचे विकार, WHOचा आरोग्याबाबत इशारा
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 1:50 PM

नवी दिल्ली – जगातील जवळपास निम्मी लोकसंख्या तोंडाच्या आजाराने (किडलेले दात, हिरड्या आणि तोंडाचा कर्करोग) ग्रस्त (oral disease) आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) गुरुवारी सांगितले. ओरल हेल्थ सर्व्हिस पर्यंत पोहोचण्यासाठी असलेली असमानता एका अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. सर्वात कमकुवत आणि वंचित लोकसंख्येवर या आजारांचा वाईट परिणाम झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्यामध्ये ओरल म्हणजेच मौखिक आरोग्याकडे (oral health is neglected) बऱ्याच काळापासून दुर्लक्ष केले जात आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनोम घेब्रेसेयसस यांनी नमूद केले.

तोंडाचे अनेक आजार रोखणे व त्यांच्यावर उपचार करणे शक्य आहे, असे टेड्रोस यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेला असे आढळले आहे की जागतिक लोकसंख्येपैकी 45 टक्के लोक किंवा सुमारे 3.5 अब्ज लोक हे दात किडणे, हिरड्यांचे रोग आणि तोंडाच्या इतर रोगांमुळे ग्रस्त आहेत. 194 देशांमधील परिस्थितीचे व्यापक चित्रात असे आढळून आले की गेल्या 30 वर्षांमध्ये (तोंडाच्या आजारांनी ग्रस्त असलेली) जागतिक रुग्णसंख्या 1 अब्जाने वाढली आहे. बऱ्याच लोकांपर्यंत तोंडाचे आजार रोखण्याचे उपाय अद्याप पोहोचलेले नाहीत, हा या गोष्टीचा स्पष्ट संकेत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

दंत क्षय, दात किडणे, हिरड्यांचा गंभीर आजार, दातांची हानी होणे आणि तोंडाचा कर्करोग हे सर्वात सामान्य आजार आहेत. उपचार न केलेले दंत क्षय (दातांवर बॅक्टेरियाचा हल्ला होणे ) ही (रुग्णांमधील) सर्वात सामान्य स्थिती असून जगभरातील सुमारे 2.5 अब्ज लोक हे यामुळे प्रभावित झाले आहेत. हिरड्यांचा तीव्र आजार हे दातांचे अपरिमित नुकसान होण्यामागचे प्रमुख कारण असून त्यामुळे सुमारे 1 अब्ज नागरिक प्रभावित झाल्याचा अंदाज आहे.

दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाच्या 3,80,000 केसेसेचे होते निदान

तोंडाच्या कर्करोगाच्या सुमारे 3 लाख 80 हजार केसेसचे दरवर्षी निदान केले जाते, असे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे. तोंडाचा आजार असलेले तीन चतुर्थांश लोक हे कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील आहेत अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. सर्व देशांमध्ये कमी उत्पन्न असलेले, अपंग , एकटे किंवा वृद्धाश्रमात राहणारे नागरिक, तसेच दुर्गम भागात व ग्रामीण समुदायात अथवा अल्पसंख्यांक समूहात राहणारे लोक हे तोंडाच्या आजाराने अधिक ग्रस्त आहेत.

काय आहे कारण ? कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेह यासारख्या इतर असंसर्गजन्य रोगांसारखेच हे पॅटर्न आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. साखरेचे अधिक सेवन करणे, तंबाखूचे सेवन करणे आणि मद्यपान करणे, त्याचा गैरवापर करणे हे जोखमीचे घटक देखील समान आहेत.

दंत चिकित्सा दौऱ्यासह पुरेशा प्रमाणात मौखिक स्वास्थ्य सेवा प्रदान करण्यात येणाऱ्या अडथळ्यांवरही गुरूवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात प्रकाश टाकण्यात आला. या आजारांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असल्याचे सांगण्यात आले. यामुळे कुटुंब आणि समाजांवर आर्थिक बोजा वाढू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. बऱ्याच लोकांना या आजारांची माहिती नसल्याचेही आरोग्य संघटनेने नमूद केल. या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रस्तावांची एक यादी सादर करण्यात आली असून त्यामध्ये देशांनी त्यांच्या प्राथमिक आरोग्य प्रणालींमध्ये मौखिक आरोग्य सेवांचा समावेश करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.