Health : हिवाळ्यात हे तीन धान्य आहेत उर्जेचे माहेरघर, तुमच्या शरीराला आतून ठेवतील मजबूत …

हिवाळ्यात तुम्हाला स्वत:ला आजारांपासून दूर ठेवायचे आहे आणि तुमची प्रतिकारशक्तीही चांगली आहे, तर या हिवाळ्यात काही खास धान्यांचे सेवन करा. आरोग्यविषयक समस्या कधीही डोकेवर काढणार नाही, कोणते धान्य आहे ते जाणून घेऊया...

Health : हिवाळ्यात हे तीन धान्य आहेत उर्जेचे माहेरघर, तुमच्या शरीराला आतून ठेवतील मजबूत ...
बाजरी
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 11:15 AM

मुंबई : काही फळे तसेच भाज्या एकाच हंगामात का मिळतात, असा तुम्ही कधी विचार केला आहे का… पण यामागे एक खास कारण आहे. जसे उन्हाळ्यात पाणी किंवा रसाने भरलेली काही फळे आपल्याला मिळतात. त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आर्द्रता टाळण्यासाठी एकाच प्रकारचा फळे आणि भाजीपाला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे हिवाळ्यातही थंडी टाळण्यासाठी आणि शरिरावर या ऋतूचा परिणाम टाळण्यासाठी हिवाळ्याशी संबंधित धान्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. चला जाणून घेऊया अशा धान्यांबद्दल जे तुम्ही हिवाळ्यात खाणे आवश्यक आहे.

वजनही होते कमी, कार्यक्षमता वाढते

हिवाळ्यात शारीरिक हालचाली नगण्य असतात, त्यामुळे रक्तदाब संतुलित करणे देखील थोडे कठीण होते. अशा परिस्थितीत आपण हिवाळ्यात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी अनेक खाद्यांचे सेवन करता, ज्यामुळे वजन वाढण्याची समस्या देखील उद्भवते. अशा परिस्थितीत हिवाळ्यात येणाऱ्या या धान्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात बाजरी, मका, ज्वारी आणि ग्लुटेनमुक्त धान्यांचे सेवन करावे. यातून वजन कमी करणे सोने होतेच शिवाय शरीरही चांगलं काम करतं.

नाचणी

मांसाहार करू इच्छित नसलेल्या लोकांसाठी नाचणी हा कॅल्शियमची गरज भरुन काढण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. नाचणीला प्रथिने आणि कॅल्शियमचे भांडार देखील मानले जाते. याशिवाय नाचणीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे तुम्हाला अॅनिमियासारख्या गंभीर समस्यांपासून दूर ठेवतात. याशिवाय नाचणीमुळे तुमची त्वचा आणि केसही चांगले राहतात. यामुळे तुम्ही हिवाळ्यात नाचणीचे सेवन केलेच पाहिजे.

बाजरी

बाजरी अनेक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये भरपूर प्रथिने आढळतात. हे प्रोटीन तुमच्या स्नायूंच्या वाढीस मदत करते, ज्यामुळे वजन कमी होते. याशिवाय बाजरीच्या आत फायबरदेखील मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहतेच पण चयापचय देखील वेगवान होतो. ते खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. यासोबतच बाजरीच्या माध्यमातून रक्तातील ‘ग्लुकोज’ची पातळी नियंत्रित करणेही सोपे होते. इतकेच नाही तर बाजरी उबदार असते, त्यामुळे हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवण्यास मदत होते. अशा परिस्थितीत हिवाळ्यात बाजरीचे सेवन करावे.

ज्वारी

ज्वारीमध्ये आपल्याला व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, फायबर यांसारखे गुणधर्म मिळतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय ज्वारीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मदेखील असतात, जे कॅन्सरसारख्या समस्यांपासून बचाव करण्याचे काम करतात. एवढेच नाही तर ज्वारी हे ग्लुटेनमुक्त धान्य देखील आहे, जे रक्तातील ग्लुकोज पातळी, प्रतिकारशक्ती आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात ज्वारीचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला फायदा होतो.

संबंधित बातम्या :

Seed Production : हवामानातील बदलाचा परिणाम बिजोत्पादनावर, महाबीजकडून ‘या’ पर्यायाचा अवलंब

काय गं डाएट करुनही तुझं वजन कमी होत नाही आहे, हे असू शकतं यांचं कारण…

Rabi Season : ढगाळ वातावरणामुळे खर्चही वाढला अन् शेतकऱ्यांची चिंताही, काय आहे उपापयोजना?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.