Health | लहान मुलांना हे कॅल्शियमयुक्त पदार्थ खायला द्या, हाडे मजबूत होण्यास नक्कीच होईल मदत!

दूध, दही आणि चीज मुलांच्या आहारात नक्की समाविष्ट करा. तुम्ही त्यांचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. तुम्ही पनीर करी, मिल्क शेक आणि दही रायता बनवू शकता. या पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर असते. यामुळे वरील हे पदार्थ दिवसातून किमान एकदा तरी आहारा घ्या. यामुळे निरोगी राहण्यास देखील मदत होते.

Health | लहान मुलांना हे कॅल्शियमयुक्त पदार्थ खायला द्या, हाडे मजबूत होण्यास नक्कीच होईल मदत!
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 6:00 AM

मुंबई : कॅल्शियम (Calcium) शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. जर तुमच्या मुलांना पुरेसे कॅल्शियम मिळत नसेल तर तुम्ही त्यांच्या आहारात अनेक प्रकारचे कॅल्शियम असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ (Food) तुम्ही त्यांच्या आहारात समाविष्ट करू शकता. जर मुलांच्या शरीरात कॅल्शियम कमी झाले तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊन त्यांची हाडे कमकुवत होतात. यामुळे मुलांच्या आहारामध्ये पुरेसे कॅल्शियम असणे आवश्यक आहे. मुलांच्या शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी काही खास पदार्थांचा आहारात (Diet) समावेश करा.

दही आणि दूध

दूध, दही आणि चीज मुलांच्या आहारात नक्की समाविष्ट करा. तुम्ही त्यांचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. तुम्ही पनीर करी, मिल्क शेक आणि दही रायता बनवू शकता. या पदार्थांमध्ये कॅल्शियम भरपूर असते. यामुळे वरील हे पदार्थ दिवसातून किमान एकदा तरी आहारा घ्या. यामुळे निरोगी राहण्यास देखील मदत होते.

बदाम

बदाम अतिशय चवदार आणि आरोग्यदायी असतात. बदामामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यात कॅल्शियमही भरपूर असते. मुलांच्या आहारात तुम्ही बदामाचा समावेश करू शकता. तुम्ही भिजवलेले बदाम किंवा बदाम शेकमध्ये मिसळून मुलांना देऊ शकता. यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमी दूर होण्यास मदत होते.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या- मुलांच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. ते पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. बीन्स, ब्रोकोली आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करू शकता. ते कॅल्शियम आणि प्रथिने समृद्ध आहेत.

सोयाबीन

सोयाबीनमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये कॅल्शियम आणि लोहासारखे पोषक घटक देखील असतात. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मुलांच्या आहारात तुम्ही सोया मिल्क आणि टोफूचाही समावेश करू शकता.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.