Health | व्यायाम करणाऱ्यांनी ही आरोग्यदायी पेय पिणे अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!

लिंबूपाणी हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबापासून बनवलेल्या पेयामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते. यामुळे नेहमीच व्यायाम करून आल्यावर लिंबू पाण्याचे नक्कीच सेवन करा. वजन कमी करणाऱ्यांनी थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. व्यायाम केल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी प्यावे.

Health | व्यायाम करणाऱ्यांनी ही आरोग्यदायी पेय पिणे अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!
Image Credit source: unsplash.com
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 6:20 AM

मुंबई : आरोग्याची (Health) काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स या फाॅलो केल्या जातात. त्यापैकी एक योग आहे. योगाचे महत्त्व अशा प्रकारे वाढत आहे की केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक या शारीरिक हालचालींचा अवलंब करत आहेत. फक्त योगाच नव्हेतर कोणत्याही प्रकारचे व्यायाम (Exercise) करणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. बरेच लोक रात्री उशीरापर्यंत जागतात आणि सकाळी उशीरा उठतात. यामुळे त्यांना व्यायाम करणे शक्यत होत नाही, हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. दररोज सकाळी व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच व्यायाम करून आल्यावर आपण काही खास पेयांचे सेवन करणे फायदेशीर (Beneficial) ठरते, ही पेय नेमकी कोणती आहेत याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

लिंबूपाणी

लिंबूपाणी हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबापासून बनवलेल्या पेयामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते. यामुळे नेहमीच व्यायाम करून आल्यावर लिंबू पाण्याचे नक्कीच सेवन करा. वजन कमी करणाऱ्यांनी थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. व्यायाम केल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी प्यावे.

हे सुद्धा वाचा

मध आणि गरम पाणी

हे हेल्दी ड्रिंक तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी किंवा नंतर पिऊ शकता, मधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीर निरोगी होते, तसेच यापासून बनवलेले पेय वजन कमी करण्यास देखील मदत करते. जर शरीरात जास्त चरबी असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास मधाचे पाणी प्या, कोमट पाण्यात मधासोबत लिंबू मिसळले तर वजन लवकर कमी होते. हे पाणी तुम्ही दिवसातून कधीही पिऊ शकता.

नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात 95% पाणी आणि चरबीचे प्रमाण फारच कमी असते. नारळाचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, तसेच त्यामध्ये असलेले साइटोकिनिन, वृद्धत्वाची चिन्हे येण्यापासून प्रतिबंधित करते. नारळपाणी प्यायल्यानंतर रक्तदाब, हृदय, किडनी आणि डिहायड्रेशन सारख्या समस्यांपासून स्वतःला दूर ठेवता येते. नारळपाणी शरीरातील पाण्याची कमतरता दूर करू शकते. व्यायाम करताना जास्त घाम जातो. यामुळे लगेचच नारळपाणी प्या.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.