थायलंडमध्ये दोन नवीन वेलनेस सेंटर, जिवा आयुर्वेदची घोषणा!
या विस्ताराच्या माध्यमातून जिवा आयुर्वेद दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये आयुर्वेद पद्धती आणि उत्पादनांचा अधिक प्रचार आणि प्रसार करणार. तसेच सर्वसामान्यांसाठी आरोग्यासंदर्भात चांगल्या सोयीसुविधा देखील प्रदान करेल," असे जिवा समूहाचे अध्यक्ष ऋषी पाल चौहान यांनी उपक्रमाची घोषणा करताना म्हटलंय.
मुंबई: आयुर्वेदात भारत अग्रेसर आहे. आयुर्वेद आपली ओळख आहे. या क्षेत्रात जिवा आयुर्वेदाचे मोठे नाव आहे. आयुर्वेद आणि औषधांच्या क्षेत्रात घराघरांत नाव असलेल्या जिवा आयुर्वेदाने थायलंडमध्ये दोन वेलनेस सेंटर उभारण्याची घोषणा केलीये. थायलंडच्या पाक थोंग चाई या डोंगराळ भागात आणि चियांग माईच्या उत्तरेकडील जंगल प्रदेशात पहिले दोन “जिवा इरिट्रीट सेंटर्स” उघडण्याची ही घोषणा करण्यात आलीये. आग्नेय आशियात प्रवेश आणि विस्तार या दिशेने हे जिवा आयुर्वेदचं पहिलं पाऊल आहे.
‘जिवा आयुर्वेद आणि आयरिट्रीट यांच्यातील हे कोलॅबरेशन आरोग्याच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. हे कोलॅबरेशन आयुर्वेदातील ज्ञान, मेडिटेशन आणि माइंडफुलनेसची शक्ती एकत्र आणते. या विस्ताराच्या माध्यमातून जिवा आयुर्वेद दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये आयुर्वेद पद्धती आणि उत्पादनांचा अधिक प्रचार आणि प्रसार करणार. तसेच सर्वसामान्यांसाठी आरोग्यासंदर्भात चांगल्या सोयीसुविधा देखील प्रदान करेल,” असे जिवा समूहाचे अध्यक्ष ऋषी पाल चौहान यांनी उपक्रमाची घोषणा करताना म्हटलंय.
आरोग्यसेवेतील आयुर्वेदाचं महत्त्व, त्याची क्षमता याबद्दल जागतिक स्तरावर जागरूकता वाढवणं यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. हे कोलॅब आमच्यासाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. या उपक्रमाने माइंडफुलनेस आणि मेडिटेशन आणि निरोगीपणाला चालना मिळेल आणि जगभरातील लोकांसाठी निरोगी भविष्याचा मार्ग मोकळा होईल, असे चौहान म्हणाले.
AYUSH सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले की, आयुर्वेदातील पारंपारिक ज्ञान आणि ध्यानाच्या परिवर्तनशील शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या संयुक्त प्रयत्नांबद्दल मी जिवा आयुर्वेद आणि आयरिट्रीटचे अभिनंदन करतो. आयुर्वेदाचे अफाट ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहाचविण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी आणि त्याचा जागतिक प्रसार वाढविण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. AYUSH मंत्रालयाच्या स्थापनेपासून, पारंपारिक औषधे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करणे, ज्ञान देणे आणि त्याचा जागतिक प्रसार वाढविणे हे आमचे उद्दीष्ट आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेद आणि ध्यान धारणा देऊ शकणाऱ्या खऱ्या क्षमतेची आणि कल्याणाची जाणीव जगाला व्हावी आणि शेवटी निरोगी आणि संतुलित जगाचा मार्ग मोकळा व्हावा असे आमचे उद्दिष्ट आहे.
आयरिट्रीटचे संस्थापक मॉन्क ड्यूक यांनी संयुक्त उपक्रमाचे कौतुक केले आणि म्हटले, ” आयुर्वेदातील प्राचीन ज्ञानाची आपल्या ध्यानधारणेच्या शांततेशी सांगड घालून आपण आंतरिक शांती आणि आत्म शोधाला चालना देण्यासाठी ही एक झेप घेत आहोत. आयुर्वेदाचे प्राचीन ज्ञान आणि आयरिट्रीटच्या ध्यान आणि माइंडफुलनेस पद्धतींच्या एकत्रीकरणाद्वारे, जिवा आयरिट्रीट सेंटर्स मन, शरीर आणि आत्म्याचे पोषण करतील जेणेकरून लोकांच्या जीवनावर चांगला प्रभाव निर्माण होईल.
यावेळी बोलताना प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू, टीव्ही व्यक्तिमत्त्व आणि ज्येष्ठ राजयोग ध्यान शिक्षिका सिस्टर बी. के. शिवानी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ‘जिवा आयुर्वेद आणि आयरिट्रीटचे यांच्यातील हे सहकार्य सर्वांगीण आरोग्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आयुर्वेदाचे प्राचीन ज्ञान आणि आयरिट्रीटच्या परिवर्तनशील ध्यान पद्धतींचे एकत्रीकरण व्यक्तींना आंतरिक शांती प्राप्त करण्यास आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक विचार विकसित करण्यास सक्षम करेल, असे त्या म्हणाल्या.
वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे स्वामी विज्ञानानंद जी म्हणाले की, “जिवा आयुर्वेद आणि iRETREAT ची युती जागतिक शांतता आणि आनंद प्राप्त करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. हा उपक्रम योग आणि वेदांताच्या आदर्शांना मूर्त रूप देईल आणि जगभरातील व्यक्तींसाठी आत्म साक्षात्काराचा मार्ग विकसित करेल.