Roasted chana benefits: हाय कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी खावेत भाजलेले चणे
भाजलेले चणे हे आपल्या आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतात.
नवी दिल्ली – हेल्दी स्नॅक्सबद्दल बोलत असू तर भाजलेल्या चण्यांचा (roasted chane) विषय हमखास निघतोच. भाजलेल्या चण्यांमध्ये पोषक तत्वं (nutrition)भरपूर प्रमाणात असतात, विशेषत: त्यामध्ये प्रोटीन्स, फायबर, फोलेट, मिनरल्स आणि फॅटी ॲसिड हे मुबलक प्रमाणात असते. हे उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी साखरेची पातळी (sugar level) नियंत्रित करण्यास देखील उपयुक्त आहे. हे हृदयासाठी रक्त आणि आतड्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील उपयुक्त आहे. भाजलेले चणे हे हृदय, रक्त आणि आतड्यांसाठी देखील खूप फायदेशीर ठरते.
चणे हे एक प्लांट बेस्ड प्रोटीन सोर्स आहे, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते, तसेच आपले केस, त्वचा, नखं आणि स्नायूही निरोगी राहतात. जाणून घेऊया चणे खाण्याचे फायदे –
हाय फायबर मोठ्या प्रमाणात असते – भाजलेल्या चण्यांमध्ये चांगले फायबर असते जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते. भाजलेले चणे खाल्ल्याने आपले पोट बराच काळ भरलेले राहते व आपल्याला फूड क्रेव्हिंग होत नाही. परिणामी वजन वाढत नाही.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर – भाजलेले चणे हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असलेल्या पदार्थांपैकी एक आहे. चण्याची जीआय लेव्हल 28 इतकी आहे, त्यामुळे भाजलेले चणे खाणे हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक उत्तम पर्याय ठरतो.
हाडं बळकट होतात – भाजलेल्या चण्यांमध्ये मँगनीज आणि फॉस्फोरस असते, जे आपल्या हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. हे हाडांची रचना, सांधेदुखी इत्यांदीची स्थिती सुधारण्यास मदत करते.
हृदय ठेवते निरोगी – भाजलेले चणे हे मँगनीज, फोलेट, फॉस्फरस, तांबे यांनी समृद्ध असते, जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, हे रक्ताभिसरण सुधारण्यास आणि आपले हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करते.
ब्लड प्रेशर – भाजलेल्या चण्यांमध्ये कॉपर, फॉस्फरस, मँगनीज आणि मॅग्नेशिअम असते. कॉपर (तांबे) आणि मॅगनेशिअम हे जळजळ कमी करतात आणि रक्तवाहिन्यांना आराम देतात. तर मँगनीज हे ऑक्सीडेटिव्ह ताण कमी करण्यास व फॉस्फरस हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
कर्करोगापासून बचाव – भाजलेल्या चण्यांमध्ये असलेले फायबर हे कर्करोगापासून संरक्षण करते. व्हिटॅमिन बी स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण करते.