Benefits of Aloe Vera Juice : कोरफडीच्या रसामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मिळते मदत!

कोरफडीचा गर अथवा रस याचा उपयोग सौंदर्य प्रसाधने किंवा त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये होत असल्याचे तुम्ही आत्तापर्यंत ऐकले असेल. मात्र कोरफडीच्या रसामुळे आरोग्यालाही अनेक फायदे होतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

Benefits of Aloe Vera Juice : कोरफडीच्या रसामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मिळते मदत!
कोरफडीच्या रसामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मिळते मदत!
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 5:27 PM

त्वचेची काळजी घेण्यासाठी, तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी (Skin car) तुम्ही कोरफडीचा रस बऱ्याच वेळा वापरला असेल. कोरफड ही फक्त त्वचेसाठीच नव्हे तर केसांसाठीही खूप फायदेशीर असते. आयुर्वेदातही कोरफडीच्या औषधी गुणधर्माचे वर्णन केले आहे. कोरफडीचा वापर बऱ्याच पद्धतीने केला जातो. कोरफडीचा गर अथवा रस (Aloe Vera Juice) याचा उपयोग सौंदर्य प्रसाधने किंवा त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये होत असल्याचे तुम्ही आत्तापर्यंत ऐकले असेल. मात्र कोरफडीच्या रसामुळे आरोग्यालाही अनेक फायदे (Health Benefits) होतात. मधुमेह नियंत्रणात (Diabetes) ठेवण्यासाठीही कोरफडीच्या रसाचा वापर केला जातो, हे तुम्हाला माहीत आहे का ? तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरफड उपयोगी ठरू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोरफडीचा वापर कसा करावा याबद्दल जाणून घेऊया.

जाणून घ्या कोरफडीचे फायदे

स्टाइलक्रेज नुसार, कोरफडीमध्ये क्रोमिअम, मॅग्नेशिअम आणि झिंकसारखे काही पौष्टिक गुणधर्म असलेले घटक इन्सुलिनचा परिणाम वाढवतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. काही संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, कोरफडीचे सेवन केल्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी होते. कोरफडीचा रस हा बायो ॲक्टिव्ह कंपाऊंड ॲलोइन आणि लॅक्टेन सारख्या गुणांनी समृद्ध असतो, त्यामध्ये ॲंटी – इन्फ्लेमेटरी घटक असतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. त्याशिवाय कोरफडीच्या रसाचे सेवन केल्याने केसांचे आरोग्यही सुधारते. गरजेचे असलेले अमीनो ॲडही मिळते. कोरफडीच्या रसामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते आणि जळजळीची समस्या कमी होते.

कसा करावा वापर ?

कोरफडीचा रस घरच्या घरी तयार करता येऊ शकतो. त्यासाठी कोरफडीची पाने काढून ती स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ती मधून कापावीत व त्यातील रस बाहेर काढून त्यात पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावा. नंतर त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करावे. मधुमेहाचे रुग्ण कोरफडीचा, पावडरच्या स्वरुपातही वापर करू शकतात. तसेच कोरफडीचे आवळ्याच्या पावडरीसहित सेवन करता येते. कोरफडीचा रस प्यायल्याने वजन वाढत नाही आणि मधुमेहसुद्धा नियंत्रणात राहतो. मधुमेहाच्या रुग्णांना त्वचेसंबंधी काही समस्या अथवा इन्फेक्शन झाले असेल तर तेही कोरफडीचा रस प्यायल्याने कमी होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

मधुमेहाच्या रुग्णांना एखादी जखम झाली असेल तर ती लवकर बरी होत नाही. ती ठीक करण्यासाठी कोरफडीचे जेल वापरता येऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोरफड फायदेशीर ठरू शकते. मात्र दिनचर्येत त्याचा समावेश करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांशी सल्लामसलत करावी.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञान व माहितीवर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.