Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, मात्र सक्रिय रुग्णसंख्या अडीच लाखांच्या खाली
गेल्या 24 तासात भारतात 22 हजार 431 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 318 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 24 हजार 602 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 4 हजारांनी वाढ झाली. कालच्या दिवसात देशात 22 हजार 431 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 318 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या अडीच लाखांच्या आत आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 22 हजार 431 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 318 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 24 हजार 602 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 38 लाख 94 हजार 312 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 258 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 49 हजार 856 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 44 हजार 198 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 92 कोटी 63 लाख 68 हजार 608 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 22,431
देशात 24 तासात डिस्चार्ज – 24,602
देशात 24 तासात मृत्यू – 318
एकूण रूग्ण – 3,38,94,312
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 2,44,198
एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,32,00,258
एकूण मृत्यू – 4,49,856
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 92,63,68,608
गेल्या 24 तासातील लसीकरण – 43,09,52
भारत में पिछले 24 घंटों में कोरोना वायरस के 22,431 नए मामले आए, 24,602 रिकवरी हुईं और 318 लोगों की कोरोना से मौत हुई। #COVID19
कुल मामले: 3,38,94,312 सक्रिय मामले: 2,44,198 कुल रिकवरी: 3,32,00,258 कुल मौतें: 4,49,856 कुल वैक्सीनेशन: 92,63,68,608 pic.twitter.com/CDmOe8ymsf
— ANI_HindiNews (@AHindinews) October 7, 2021
देशात कालच्या दिवसात आढळलेल्या 22 हजार 431 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी एकट्या केरळामध्ये 12 हजार 616 रुग्ण सापडले आहेत. तर 318 कोरोनाबळींपैकी केरळमधील 134 जणांचा समावेश आहे.
Out of 22,431 new COVID cases and 318 deaths, Kerala reported 12,616 cases and 134 deaths yesterday
— ANI (@ANI) October 7, 2021
संबंधित बातम्या :
कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज