Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 हजाराच्या आत, सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घट
गेल्या 24 तासात भारतात 25 हजार 72 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 389 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 44 हजार 157 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 5 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात 25 हजार 72 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 389 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या सध्या साडेतीन लाखांच्या खाली गेली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 25 हजार 72 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 389 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 44 हजार 157 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 24 लाख 49 हजार 306 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 16 लाख 80 हजार 626 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 34 हजार 756 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 33 हजार 924 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 58 कोटी 25 लाख 49 हजार 595 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 25,072
देशात 24 तासात डिस्चार्ज – 44,157
देशात 24 तासात मृत्यू – 389
एकूण रूग्ण – 3,24,49,306
एकूण डिस्चार्ज – 3,16,80,626
एकूण मृत्यू – 4,34,756
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,33,924
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 58,25,49,595
गेल्या 24 तासातील लसीकरण – 7,95,543
India reports 25,072 new #COVID19 cases, 44,157 recoveries and 389 deaths in the last 24 hrs, as per Health Ministry.
Total cases: 3,24,49,306 Total recoveries: 3,16,80,626 Active cases: 3,33,924 Death toll: 4,34,756
Total vaccinated: 58,25,49,595 (7,95,543 in last 24 hours) pic.twitter.com/jiyOwmadnx
— ANI (@ANI) August 23, 2021
संबंधित बातम्या :
कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले
सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?