Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 38 हजारांवर, 624 कोरोनाबळी
गेल्या 24 तासात भारतात 38 हजार 792 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 624 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 38 हजार 792 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 624 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 38 हजार 792 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 624 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 9 लाख 46 हजार 74 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 1 लाख 4 हजार 720 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 11 हजार 408 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 29 हजार 946 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 38 कोटी 76 लाख 97 हजार 935 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 38,792
देशात 24 तासात डिस्चार्ज – 41,000
देशात 24 तासात मृत्यू – 624
एकूण रूग्ण – 3,09,46,074
एकूण डिस्चार्ज – 3,01,04,720
एकूण मृत्यू – 4,11,408
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,29,946
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 38,76,97,935
भारत में #COVID19 के 38,792 नए मामले आने के बाद कुल पॉजिटिव मामलों की संख्या 3,09,46,074 हुई। 624 नई मौतों के बाद कुल मौतों की संख्या 4,11,408 हो गई है।
41,000 नए डिस्चार्ज के बाद कुल डिस्चार्ज की संख्या 3,01,04,720 हुई। देश में सक्रिय मामलों की कुल संख्या 4,29,946 है। pic.twitter.com/rZ4Crpa2uv
— ANI_HindiNews (@AHindinews) July 14, 2021
संबंधित बातम्या :
(New 38792 Corona Cases in India in the last 24 hours)