Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, सक्रिय रुग्णसंख्या 4.1 लाखांवर
गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 766 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 308 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 91 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 42 हजार 766 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 308 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना असल्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वाढत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 766 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 308 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 91 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 29 लाख 88 हजार 673 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 21 लाख 38 हजार 92 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 40 हजार 533 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 10 हजार 48 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 68 कोटी 46 लाख 69 हजार 521 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 42,766
देशात 24 तासात डिस्चार्ज – 38,091
देशात 24 तासात मृत्यू – 308
एकूण रूग्ण – 3,29,88,673
एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी)- 3,21,38,092
एकूण मृत्यू – 4,40,533
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,10,048
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 68,46,69,521
गेल्या 24 तासातील लसीकरण –
भारत में पिछले 24 घंटों में कोरोना वायरस के 42,766 नए मामले आए, 38,091 रिकवरी हुईं और 308 लोगों की कोरोना से मौत हुई।
कुल मामले: 3,29,88,673 सक्रिय मामले: 4,10,048 कुल रिकवरी: 3,21,38,092 कुल मौतें: 4,40,533 कुल वैक्सीनेशन: 68,46,69,521 pic.twitter.com/ejxmle4pYq
— ANI_HindiNews (@AHindinews) September 5, 2021
केरळात किती कोरोनाग्रस्त?
42 हजार 766 नवीन कोरोनाग्रस्तांपैकी एकट्या केरळमध्ये काल 29 हजार 682 रुग्ण सापडले, तर 308 कोरोना बळींपैकी केरळात 142 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
देश में पिछले 24 घंटों में कोरोना वायरस के 42,766 नए मामले आए और 308 मौतें हुईं, जिसमें केरल में कल आए कोरोना वायरस के 29,682 मामले और 142 मौतें शामिल हैं।
— ANI_HindiNews (@AHindinews) September 5, 2021
कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भिती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे
संबंधित बातम्या :
कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज