Panic Attack : कोणालाही होऊ शकते ‘पॅनिक अटॅक’ची समस्या; जाणून घ्या, त्याची लक्षणे आणि उपाय!

व्यस्त जीवनशैली आणि वाढलेल्या कामांच्या जबाबदारीमुळे प्रत्येकाचे जीवन तणावग्रस्त झाले आहे. अशात कुणालाही पॅनिक अटॅकची समस्या येऊ शकते. हा अटॅक येण्यापूर्वी काही मानसिक आणि शारीरिक लक्षणे दिसून येतात. जाणून घ्या, पॅनिक अटॅकशी संबंधित लक्षणांबद्दल सविस्तर माहिती.

Panic Attack : कोणालाही होऊ शकते ‘पॅनिक अटॅक’ची समस्या; जाणून घ्या, त्याची लक्षणे आणि उपाय!
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 6:45 PM

व्यस्त जीवन आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे (Due to impaired lifestyle) लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ज्यामध्ये आजकाल मधुमेह, हाय बीपीसारखे गंभीर आजार होणे सामान्य झाले आहे. लोक या दिनचऱ्येमध्ये कायम तणावग्रस्त असतात. बहुतेकांना यामुळे बिघडलेल्या मानसिक आरोग्याचा (Mental health) सामना करावा लागतो. तणाव आणि मेंदूशी संबंधित इतर समस्यांमुळे कोणालाही पॅनिक अटॅक येऊ शकतो. तज्ञांच्या मते, पॅनिक अटॅकच्या लक्षणांमागे भीती किंवा चिंता (Fear or anxiety) हे कारण असू शकते. मानसिक आरोग्याशी संबंधित या समस्येदरम्यान, भीती, अस्वस्थता, चिंता अशा प्रकारात व्यक्तीला त्रास होतो. एखाद्या मोठ्या अपघाताच्या किंवा अडचणीच्या वेळी पॅनिक अटॅक येऊ शकतो. परंतु हळूहळू व्यक्ती त्यातूनही सावरते. दरम्यान, ही समस्या वारंवार उद्भवल्यास, काळजी करण्यासारखे आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही समस्या मानसिक आरोग्यामुळे असू शकते. परंतु शारीरिक लक्षणे देखील त्याच्याशी संबंधित आहेत.

चिंता किंवा भीती

जर एखाद्या व्यक्तीला चिंता किंवा कोणत्याही प्रकारची भीती वाटू लागली, तर तो पॅनिक अटॅकच्या समस्येत येऊ शकतो. हे मानसिक आरोग्याशी संबंधित लक्षण आहे. यामुळे, व्यक्तीला हृदय, मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये थोड्या काळासाठी वेदना जाणवते. चिंता किंवा भीती असल्यास व्यक्तीने दीर्घ श्वास घेऊन लगेच पाणी प्यावे.

जलद हृदयाचा ठोका

जर एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले तर त्याला पॅनिक अटॅक येऊ शकतो. पॅनिक अटॅक ही एक मानसिक समस्या आहे. परंतु जेव्हा तो होतो तेव्हा व्यक्तीच्या हृदयाचे ठोके जलद होणे यासारखी शारीरिक लक्षणे दिसतात. इतकेच नाही तर पीडित व्यक्तीला जास्त घाम येण्याची समस्या देखील होऊ लागते.

हे सुद्धा वाचा

हात आणि पायामध्ये वेदना

असे मानले जाते की जेव्हा पॅनिक अटॅक येतो तेव्हा शरीरातील रक्ताभिसरणात समस्या येते. बाधित व्यक्तीला हात-पायांमध्ये अशक्तपणा जाणवू लागतो आणि हे देखील एक प्रकारचे शारीरिक लक्षण आहे. जेव्हा रक्ताभिसरण विस्कळीत होते. तेव्हा पायांच्या तळवे आणि हाताच्या तळव्यामध्ये वेदना सुरू होतात. तुम्हाला पॅनिक अटॅकपासून वाचवायचे असेल तर त्यासाठी नियमित योगाभ्यास करायला हवा. हा उपाय तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी बनवू शकतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.