उत्तर प्रदेशमध्ये ‘कोरोना माते’चं मंदिर, जयजयकार करत प्रसाद ठेऊन प्रकोप कमी करण्यासाठी लोकांच्या रांगा
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात किती मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे हे पाहायचं असेल तर उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथे याचं चांगलं उदाहरण समोर आलंय.
लखनौ : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात किती मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे हे पाहायचं असेल तर उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथे याचं चांगलं उदाहरण समोर आलंय. या ठिकाणी अंधश्रद्धेतून थेट कोरोना मातेचं मंदिरच उभारण्यात आलंय. तेथील लोक इतकंच करुन थांबले नाही तर या कोरोना मातेला प्रसाद ठेऊन तिच्या नावाचा जयजयकारही सुरू झालाय. यासाठी लोक गर्दीही करत आहेत. असं केल्यानं कोरोना माता आपल्या गावावरील प्रकोप कमी करेल आणि संसर्ग कमी होईल, असा अजब दावा हे लोक करत आहेत (People build Corona Mata temple in Pratapgarh Uttar Pradesh).
या कोरोना मातेच्या मंदिराची बातमी समोर आल्यावर देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर अनेक लोक यावर टोलेबाजी करत आहेत. प्रतापगडमधील एका गावात गावकऱ्यांनी एका लिंबाच्या झाडाखाली छोटंसं कोरोना मातेचं मंदिर (Pratapgarh Corona Mata Temple) बनवलं. त्यानंतर याची देशभरात चर्चा झाली आणि लोक मोठ्या संख्येने येथे येण्यास सुरुवात झाली. लोक येथे येऊन या देवीची पूजाही करत आहेत.
‘Corona Mata’ temple comes up under a neem tree at a village in Pratapgarh district
“Villagers collectively decided & set up the temple with belief that praying to the deity would definitely offer respite to people from Coronavirus,” a villager said yesterday. pic.twitter.com/jA3SGU0RQE
— ANI UP (@ANINewsUP) June 12, 2021
मंदिर तयार करण्यामागे गावकऱ्यांचं म्हणणं काय?
मंदिर उभारणाऱ्या गावकऱ्यांच्या मते कोरोना मातेची पूजा केल्यास गावात कोरोना संसर्ग होणार नाही (Corona Infection). यामुळे लोकांचं कोरोनापासून संरक्षण होईल. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी मंदिर उभं केल्यानंतर देवीला मास्क घातलाय आणि मंदिराच्या भिंतीवर दोन्ही बाजूला अंतर राखा आणि दूरवरुनच दर्शन घेण्याची सूचना लिहिली आहे. तसेच मास्क घालण्यास सांगण्यात आलंय.
अंधश्रद्धा आणि अपप्रचाराचे बळी
गावातील लोक या साथीरोगाला देवीचा प्रकोप मानत आहेत. लोकांमध्ये योग्य माहितीचा आणि शिक्षणाचा अभाव हे या अंधश्रद्धेमागील मुख्य कारण असल्याचं दिसतंय. त्यातूनच त्यांनी कोरोनापासून संरक्षणासाठी वैज्ञानिक उपाययोजना करण्याऐवजी कोरोना मातेचं मंदिर उभं करुन कर्मकांड करणं सुरू केलंय. इतकंच नाही कोरोना संसर्गाला खुलं आमंत्रण देणाऱ्या गोष्टीही होत आहेत. अनेक लोक येथे गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनापासून संरक्षण होण्याऐवजी कोरोना संसर्गाचा धोका वाढणार असल्याचंच एकूण चित्र आहे.
हेही वाचा :
प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मिळवली पीएचडी, पण काळाने घाला घातला, कोल्हापुरातल्या तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोना तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक, पालकांनी संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या : छगन भुजबळ
पॉझिटिव्हीटी दर, ऑक्सिजन बेडस उपलब्धतेनुसार, स्थानिक प्रशासन निर्बंधाबाबत निर्णय घेणार, 14 जूनपासून अमंलबजावणी
व्हिडीओ पाहा :
People build Corona Mata temple in Pratapgarh Uttar Pradesh