Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतत ओटीपोटात दुखणे असू शकते यकृत खराब होण्याचे लक्षण! अशी घ्या स्वतःची काळजी…

जर तुम्हाला अनेकदा पोटदुखी, उलट्या आणि थकवा जाणवत असेल, तर हे यकृत (Liver) वाढत असल्याचे लक्षण आहे. अशा स्थितीत यकृत हळूहळू खराब होऊ लागते. हा आजार सायलेंट किलर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच, या आजारावर वेळीच उपचार होणे अत्यंत गरजेचे आहे.

सतत ओटीपोटात दुखणे असू शकते यकृत खराब होण्याचे लक्षण! अशी घ्या स्वतःची काळजी...
Liver
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 4:48 PM

मुंबई : जर तुम्हाला अनेकदा पोटदुखी, उलट्या आणि थकवा जाणवत असेल, तर हे यकृत (Liver) वाढत असल्याचे लक्षण आहे. अशा स्थितीत यकृत हळूहळू खराब होऊ लागते. हा आजार सायलेंट किलर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच, या आजारावर वेळीच उपचार होणे अत्यंत गरजेचे आहे.

सर गंगा राम रुग्णालयाच्या यकृत आणि गॅस्ट्रो विभागाचे अध्यक्ष डॉ. अनिल अरोरा सांगतात की, यकृतामध्ये जेव्हा जेव्हा काही समस्या निर्माण होतात, तेव्हा ते स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्कार टिश्यू बनवण्यास सुरुवात करतात. परंतु, काहीवेळा या टिश्यूज अधिकाधिक कडक होतात आणि निरोगी ऊतकांमध्ये बदलतात. यामुळे यकृतालाच नुकसान होते आणि या सर्व समस्या उद्भवतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यकृत वाढण्याची अनेक कारणे आहेत. ही समस्या अनेकदा लिव्हर सिरोसिस किंवा फॅटी लिव्हरमुळे देखील उद्भवू शकते. अशा अनेक प्रकरणांमध्ये, पित्ताशयातील अडथळ्यामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. जे लोक दारूचे सेवन करतात, ज्यांना लठ्ठपणाचा त्रास होतो आणि ज्यांना कधी हिपॅटायटीसचा संसर्ग झाला आहे, अशा लोकांना यकृत वाढण्याची शक्यता अधिक असते.

हळूहळू दिसू लागतात लक्षणे!

याविषयी माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, यकृत निकामी होण्याची लक्षणे हळूहळू दिसून येतात. म्हणूनच या आजाराला सायलेंट किलर म्हणतात. अनेक प्रकरणांमध्ये, यकृत पूर्णपणे निकामी झाल्यानंतर या समस्या आढळतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा यकृत निकामी होण्याचा धोकाच अधिक असतो. अशावेळी यकृत प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग असू शकतो. म्हणून, जर एखाद्याला पोटदुखीची समस्या असेल, तर त्याने त्याची यकृत कार्य चाचणी (LFT) किंवा सेरोलॉजी चाचणी करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये यकृत मोठे झाले असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अशाप्रकारे करा स्वतःचा बचाव

डॉक्टर म्हणतात की, यकृताशी संबंधित कोणतीही समस्या टाळण्यासाठी, लोकांनी आपल्या आहाराची काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे. जेवणात साखर, मीठ आणि मैद्याचा वापर कमीत कमी करावा. जे लोक दारूचे सेवन करतात, त्यांनी हे व्यसन सोडून द्यावे. आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात घ्यावीत. तसेच रोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. शरीराचे वजन जास्त असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करावा.

हेही वाचा :

Breaking News: अमेरीकेत कोरोनाचा स्फोट, दरदिवशी लाख जणांना नव्यानं लागण, पश्चिम यूरोपात प्रत्येक देशात ओमिक्रॉनचे रुग्ण

Omicron Variant : ओमिक्रॉनची देशात एन्ट्री, जाणून घ्या काय आहेत लक्षणे आणि कोणती खबरदारी घेणे आवश्यक!

Flaxseed Benefits | थंडीच्या दिवसांत ‘आळशी’ ठरेल अतिशय गुणकारी, जाणून घ्या याचे अधिक फायदे…

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.