डायबिटीसआधी शरीरात दिसतात महत्त्वाची लक्षणं! ती लक्षणं ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष नको

Pre-Diabetes : डायबिटीज हा एक गंभीर आजार आहे. हा आजार झाला की आयुष्यभर आपला पाठलाग सोडत नाही म्हणूनच हा आजार होण्यापूर्वी म्हणजेच प्री डायबिटीजचे शरीरात काही लक्षणं दिसताच त्यावर योग्य उपचार घेणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

डायबिटीसआधी शरीरात दिसतात महत्त्वाची लक्षणं! ती लक्षणं ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष नको
डायबेटिसचा धोका वेळीच ओळखा!
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 6:44 PM

Pre Diabetes : प्री-डायबिटीज (pre diabetic)  म्हणजे डायबिटीज होण्यापूर्वी ही स्टेज कोणत्याही व्यक्तीसाठी घातक ठरू शकते. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपली जीवनशैली बदलणे देखील गरजेचे आहे. जेव्हा आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी (blood sugar level) मर्यादेपेक्षा जास्त वाढून जाते तेव्हा परंतु डायबिटीज पातळी पर्यंत पोहोचत नाही अशा लेव्हलला प्री डायबिटीज स्टेज असे म्हणतात. बहुतेक वेळा लाइफस्टाइल व आहारातील पद्धती न बदलल्यामुळे सुद्धा अनेक लोकांचा डायबिटीस टाईप 2 मध्ये त्यांचा समावेश होत असतो. अशा वेळी या घातक ठरणाऱ्या आजारापासून आपल्याला सुटका मिळवणे अशक्य होऊन जाते. प्री डायबिटीजवर नियंत्रण मिळवता येऊ शकते परंतु जर आपण आपल्या आहारामध्ये व जीवनशैलीमध्ये बदल नाही केले तर यापासून देखी सुटका आपली होऊ शकत नाही. या आजारापासून जर आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर अशा वेळी काही पथ्य पाळणे देखील गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या वजनावर नियंत्रण (weight control) ठेवावे लागेल. वजन कमी करण्यासाठी योग्य तो व्यायाम आणि सकस आहार सेवन करावा लागेल.

प्री-डायबिटीजचे लक्षण

-वजन लवकर कमी न होणे

-पोटावर अतिरिक्त चरबी वाढणे

– नेहमी अशक्तपणा वाटणे

– नेहमी गोड पदार्थ खाण्याची इच्छा होणे

– शरीरात वेदना आणि डोके दुःखी जाणवणे

– महिलांच्या शरीरात हार्मोन्स बदल होणे

– त्वचा संदर्भातील समस्या उद्भवणे

प्री-डायबिटीज समस्यांवर नियंत्रण कसे ठेवायचे याबद्दल महत्वाच्या टीप्स आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल

भरपूर पाणी प्यावे

आपल्या शरीराला पाण्याची कमतरता भासू न देणे म्हणूनच जास्तीत जास्त दिवसभरातून प्रत्येकाने पाणी प्यायला हवे,असे केल्याने प्री डायबिटीज नियंत्रणात आणता येते सोबतच जास्त पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला सुद्धा फायदा होतो. पाणी सेवन केल्याने शरीरातील रक्तामध्ये असणारी साखर नियंत्रणात राहते.

ब्लॅक कॉफीचे सेवन करा

अनेकांना मलई वाली व जास्त साखर असलेली चहा व कॉफी आवडत असते परंतु जर तुम्हाला प्री डायबिटीज नियंत्रणात आणायची असेल तर त्यासाठी ब्लॅक कॉफी पिणे लाभदायक ठरते. यामुळे तुम्ही मलई व साखर पासून लांबच रहाल,असे केल्याने तुमच्या रक्तातील साखर सुद्धा नियंत्रणात राहील. ब्लॅक कॉफीचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत. ब्लॅक कॉफी नियमितपणे प्यायल्याने आपल्या शरीरातील अति लठ्ठपणाची समस्या दूर होते व आपले वजन नियंत्रणात राहते. या कॉफीमुळे आपल्या शरीरातील कॅलरीज सुद्धा वाढत नाही.

सोडा वॉटर सेवन करू नये

सोडावॉटर पिणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये साखर आणि कॅलरीज असतात.जर आपण नियमितपणे सोडावॉटर प्यायलो तर आपल्याला डायबिटीस बरोबरच अन्य घातक समस्या सुद्धा होऊ शकतात. एका संशोधनानुसार एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, जे लोक नेहमी सोडा वॉटर पितात त्यांच्यामध्ये टाईप टू असलेल्या डायबिटीज चे प्रमाण आढळून आलेले आहे .अशा मध्ये 26% हा आजार होण्याचा धोका देखील उद्भवतो म्हणूनच प्री डायबिटीज वर जर आपल्याला नियंत्रणात ठेवायचा असेल तर सोडा वाटर आपल्याला सोडावा लागेल.

एप्पल साइड विनेगर- आपल्या आहारात आणि एक्सरसाइज रुटीन मध्ये बदल करण्यासोबतच आपल्याला रक्तातील शुगर कमी करण्यासाठी सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला एप्पल साइडर विनेगर सेवन करायला हवा. एप्पल साइडर विनेगर सेवन केल्याने रक्तातील शुगर लेवल वाढत नाही.

अशाप्रकारे आपण व्यवस्थित काळजी घेतल्यास आपल्या शरीरामध्ये प्री डायबिटीज ची लक्षणे आपल्याला ओळखता येतील. ही लक्षणे ओळखल्यानंतर काही पदार्थांवर जर आपण नियंत्रण ठेवल्यास तुमच्या शरीराला कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही परिणामी भविष्यात डायबिटीज सारखा गंभीर आजार देखील होणार नाही.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या

संबंधित बातम्या :

दमा रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरतात धोकादायक, आजच बदला आपला डाएट

रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचे सेवन टाळा; अन्यथा करावा लागेल लठ्ठपणाचा सामना

सिगरेट आणि दारुचे व्यसन पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त घातक; गर्भाशयाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.