मूत्रविसर्जनाशी संबंधित ‘या’ 5 समस्यांकडे चुकूनही दुर्लक्ष नको, प्रोस्टेट कॅन्सरचे असू शकतात लक्षणे!
लघवी करताना बऱ्याच वेळा त्रास होतो किंवा लघणी करताना रक्त पडते. ही धोक्याची घंटा आहे. कारण ही सर्व लक्षणे प्रोस्टेट कॅन्सरची आहेत. प्रमाणापेक्षा जास्त आणि वारंवार लघवी येत असेल तर तो सुध्दा प्रोस्टेट कॅन्सरचा धोका आहे. लघवी करताना काही समस्या येत असतील आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करत असाल तर ते आपल्या आरोग्यासाठी घातक आहे
मुंबई : आपल्या शरीरात अन्नासारख्या काही गोष्टी आत येतात तर काही गोष्टी या बाहेरसुद्धा पडतात. मल, लघवी ही त्याची काही प्रातिनिधिक नावे आहेत. यामध्ये काही लोकांना लघवीशी संबंधित अनेक अडचणी असतात. मात्र, आपण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. मात्र, लघवी करताना काही समस्या येत असतील आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करत असाल तर ते आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. (Prostate Cancer 5 symptoms, do not ignore)
लघवी करताना बऱ्याच वेळा त्रास होतो किंवा लघणी करताना रक्त पडते. ही धोक्याची घंटा आहे. कारण ही सर्व लक्षणे प्रोस्टेट कॅन्सरची आहेत. प्रमाणापेक्षा जास्त आणि वारंवार लघवी येत असेल तर तो सुध्दा प्रोस्टेट कॅन्सरचा धोका आहे. असे क्लीव्हलँड क्लिनिक अक्रॉन जनरल मॅकडॉवेल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. ओसी तुतु ओवुसु म्हणतात.
प्रोस्टेट कॅन्सर हा जास्त करून पुरूषांमध्ये आढळतो. विशेष म्हणजे या कॅन्सरची लक्षणे लगेचच लक्षात येत नाहीत. ज्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. सुरूवातीला प्रत्येकजण प्रोस्टेट कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. दरवर्षी या प्रोस्टेट कॅन्सरमुळे जगभरात अनेक लोक मरतात.
प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे –
वारंवार लघवी येणे
तुम्ही दिवसभरात दोन लिटरपेक्षा जास्त पाणी किंवा तरल पदार्थांचे सेवन करत असाल तर तुम्ही चार ते सात वेळा लघवीला जाऊ शकता. मात्र, एखादी व्यक्ती दिवसभरात तीन लीटरपेक्षा जास्त लघवी करत असेल तर ते धोकादायकच आहे.
लघवी करताना रक्त येणे
आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल की, लघवी करताना रक्त येते. आपण त्याकडे जास्त करून दुर्लक्ष करतो. मात्र, हे प्रोस्टेट कॅन्सरचे मोठे लक्षण आहे. यामुळे जर आपल्याला लघवी करताना रक्त येत असेल तर आपण डाॅक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
लघवी करताना त्रास होणे
ज्यावेळी आपण लघवीसाठी जातो. त्यावेळी लघवी करताना आपल्याला त्रास होत असेल आणि आपण लघवी करू शकत नसाल तर हे सुध्दा प्रोस्टेट कॅन्सरचे लक्ष आहे.
रात्री वारंवार लघवी येणे
बऱ्याच जणांना रात्रीच्या वेळी वारंवार लघवी येण्याची समस्या असते. आपल्याला वाटते की, आपण दिवसा जास्त पाणी पिल्यामुळे आपल्याला सारखी लघवी येत आहे. मात्र, हे प्रोस्टेट कॅन्सरचे लक्ष आहे.
लघवी न येणे
झोपल्यानंतर लघवी आल्यासारखे वाटणे मात्र, लघवीला गेल्यावर लघवी न येणे. किंवा लघवी करताना थेंब, थेंब पडणे हे देखील प्रोस्टेट कॅन्सरचे लक्षणे आहेत.
संबंधित बातम्या :
Weight Loss: पोटाच्या चरबीचे प्रकार किती?; जाणून घ्या पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Prostate Cancer 5 symptoms, do not ignore)