भोपळ्याच्या बिया कधी आणि का खाव्यात?
भोपळ्याच्या बिया सहसा खीर, लाडू अशा अनेक गोड पदार्थांमध्ये टाकून खाल्ल्या जातात. आज आम्ही तुमच्यासाठी भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे घेऊन आलो आहोत. भोपळ्याच्या बिया मधुमेह नियंत्रण आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात, चला जाणून घेऊया भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे...
भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 6 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन के, फॉस्फरस, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, तांबे, व्हिटॅमिन बी 2 आणि पोटॅशियम सारख्या गुणधर्मांचा साठा आहे. त्यामुळे भोपळ्याच्या बिया सहसा खीर, लाडू अशा अनेक गोड पदार्थांमध्ये टाकून खाल्ल्या जातात. आज आम्ही तुमच्यासाठी भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे घेऊन आलो आहोत. भोपळ्याच्या बिया मधुमेह नियंत्रण आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात, चला जाणून घेऊया भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे…
भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे
- भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडेंट्स असतात जे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात. अशा वेळी मधुमेहाचे रुग्ण भोपळ्याच्या बिया स्नॅक म्हणून खाऊ शकतात.
- भोपळ्याच्या बियांमध्ये निरोगी चरबी आणि फायबर सारखे बरेच अँटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात. त्याचबरोबर भोपळ्याच्या बियांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड देखील आढळतात, जे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी असतात.
- भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकचे प्रमाण चांगले असते, जे आपल्या मेंदूसाठी उत्कृष्ट मानले जाते. त्यामुळे भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने मेंदूचे कार्य सुधारते, तसेच शरीरातील अनेक अवयवांना फायदा होतो.
- भोपळ्यामध्ये मध्यभागी अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने संधिवात म्हणजेच सांधेदुखीपासून मुक्ती मिळते. अशावेळी भोपळ्याच्या बियाच्या तेलाने सांध्यांना मसाज करा.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)