कच्चे दूध पिण्याचे हे धोके माहिती आहेत काय? वेळीच सावध व्हा…

कच्चे दुध हानिकारक जीवाणू मारण्यासाठी पाश्चराइज् केले जाते आणि आपण ते न उकळता अनपाश्चराइज् दूध प्यायले तर त्यातून आपणास अनेक गंभीर आजार होऊ शकतात, ज्याची कल्पनाही आपण केली नसेल.

कच्चे दूध पिण्याचे हे धोके माहिती आहेत काय? वेळीच सावध व्हा...
Milk Pouring
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 2:49 PM

मुंबई : अनेक वेळा आपण दूध न उकळताच ते पित असतो. खासकरुन लहान मुलांना उकळलेले दूध आवडत नसल्याने ते कच्चेच पित असल्याचे दिसून येत असते. परंतु कच्चे दूध (Raw Milk) शरीराला घातक असते. विशेषकरुन लहान मुले कच्च दूध पित असतील तर ते त्यांच्या शरीराला अपायकारक ठरत असून अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरते. दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आणि विकासासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. पण कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी धोकादायक (Dangerous)ठरू शकते. एवढेच नाही तर कच्च्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचाही आरोग्यावर वाईट परिणाम (Health Issues) होत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)च्या अहवालानुसार 1993 ते 2012 पर्यंत कच्चे दूध किंवा कच्च्या दुधाचे पदार्थ जसे की आइस्क्रीम, सॉफ्ट चीज आणि दही इत्यादींमुळे अनेक प्रकारच्या समस्या समोर आल्या आहेत. या सर्वांमुळे साधारणत: 1909 लोक आजारी पडले तर 144 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले. कच्चे दूध हे गाय, म्हैस, मेंढ्या, शेळ्या किंवा इतर कोणत्याही प्राण्यापासून मिळते. कच्च्या दुधात हानिकारक जीवाणू मारण्यासाठी पाश्चराइज् केले जाते आणि जर आपण अनपेश्चराइज् दूध प्यायले तर यातून गंभीर पोटाच्या समस्या निर्माण होत असतात.

ही आहेत दुष्परिणाम

कच्चे दूध आणि कच्च्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने आतडे आणि पोटाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कच्च्या दूधाचे नियमित सेवन केल्यास जुलाब, पोटदुखी, डिहायड्रेशन, मळमळ, उलट्या, ताप, वजन कमी होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. कच्चे दूध विशेषतः गर्भवती महिला आणि मुलांसाठी हानिकारक आहे. आरोग्यासाठी नेहमी पाश्चराइज् दूध प्यावे. विशिष्ट तापमानाला दूध गरम करून हानिकारक जीवाणू नष्ट होत असल्याने ते पिण्यासाठी योग्य समजले जाते. कच्च्या दुधात कॅम्पिलोबॅक्टर, क्रिप्टोस्पोरिडियम, ई. कोलाय, लिस्टेरिया आणि साल्मोनेला यांसारखे हानिकारक जीवाणू आढळतात. हे सर्व विषमज्वर, क्षयरोग, घटसर्प, क्यू ताप आणि ब्रुसेलोसिस यांसारख्या रोगांसाठी जबाबदार असू शकतात. कच्चे दूध पिणे आणि कच्च्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

कच्च्या दुधात आढळणारे धोकादायक बॅक्टेरिया गर्भवती महिलांसाठी अनेक धोके निर्माण करु शकतात. यामुळे गर्भपात, अकाली प्रसूती, गंभीर आजार आणि अगदी नवजात बालकांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कच्चे दूध पिणाऱ्या किंवा कच्च्या दुधापासून बनवलेले पदार्थ खाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याला गंभीरपणे हानी पोहोचू शकते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी ते अधिक धोकादायक ठरू शकते.

संबंधित बातम्या :

अनवाणी चालण्याचे फायदे ऐकून थक्क व्हाल, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक चमत्कारी बदल

कोरोनातून बरे झालात तरीही डोकेदुखीचं चक्र सुरुच आहे? हे काही घरगुती उपाय फायद्याचे ठरू शकतात!

पुन्हा लॉकडाऊन! चीनमधील कोणत्या शहरात लॉकडाऊनचा निर्णय? रुग्णवाढीचा आकडा पाहून चकीतच व्हाल

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.