जेव्हा 48 तास होतील सिगारेट सोडल्यानंतर दोन दिवसानंतर तुम्हाला वास घेण्याची संवेदना परत येऊ लागेल तसेच कोणत्याही पदार्थाचे वास ओळखण्याची क्षमता तुमच्या नाकामध्ये जाणवू लागेल तसेच तुमच्या शरीरातील नसा योग्य पद्धतीने कार्य करतील. तुमच्या शरीरात स्वच्छता करण्याचे कार्य सुरू होईल जसे की तुमचे फुफुसे योग्य गतीने कार्य करतील आणि फुफ्फुसांमध्ये जो कफ चालला असेल तो हळूहळू बाहेर पडू लागेल त्याचबरोबर तुमच्या शरीरातील निकोटीन सुद्धा हळूहळू कमी होऊ लागतो. यादरम्यान बैचेनी चक्कर येणे, उपाशी राहिल्या सारखे वाटणे, अशक्तपणा जाणवणे अशा समस्या तुम्हाला त्रास देऊ लागतील.अनेक लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये डोकेदुखी उद्भवते. त्यानंतर हळूहळू परिस्थिती सर्वसामान्य होते.