कोवावॅक्सच्या लहान मुलांवरील क्लिनिकल ट्रायलसाठी सीरमचा अर्ज, सरकारी पॅनेलचा चाचणीविरोधात निर्णय
केंद्र सरकारच्या सरकारी पॅनेलनं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला कोवावॅक्सच्या लसीच्या 2 ते17 वयोगटातील मुलांवर चाचण्या करण्याविरोधात शिफारस केली आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या सरकारी पॅनेलनं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला कोवावॅक्सच्या लसीच्या 2 ते17 वयोगटातील मुलांवर चाचण्या करण्याविरोधात शिफारस केली आहे. सरकारी पॅनेलनं कोवावॅक्स या COVID-19 लसीच्या फेज 2 आणि 3 च्या क्लिनिकल ट्रायल करण्याविरोधात शिफारस केली आहे. सीरम इंन्स्टिट्यूट (Serum Institute of India) ने सोमवारी भारत सरकारच्याऔषध महानियंत्रक (DCGI) यांच्याकडे 10 ठिकाणी 920 मुलांवर कोवावॅक्सच्या लसींच्या चाचण्यांबद्दल परवानगी मागितल होती. (Serum Institute of India application for conduct clinical trials of Covavax on children Government panel recommends serum first trial on adults)
तिसऱ्या लाटेत मुलांना धोका?
कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेमध्ये प्रामुख्यानं लहान मुलं जास्त प्रभावित होतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटनं केंद्र सरकारकडे कोवावॅक्स लसीच्या क्लिनिकल चाचण्या घेण्यासाठी परवानगी मागितली होती. तिसरी लाट लक्षात घेता सीरमनं अमेरिकेच्या नोवावॅक्ससोबत सामंजस्य करार करत भारतात कोवावॅक्सची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारी पॅनेलनंतर डीसीजीआय सीरमच्या अर्जावर काय निर्णय घेणार हे पाहाव लागणार आहे.
Government panel recommends against allowing Serum Institute of India to conduct phase 2 & 3 clinical trials of Covavax #COVID19 vaccine on children of age 2-17 years: Sources pic.twitter.com/loOhzpjyFe
— ANI (@ANI) July 1, 2021
जेष्ठ नागरिकांवर पहिल्यांदा चाचणी करा
डीसीजीआय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला सरकारी पॅनेलनं सांगितलेल्या बाबी पूर्ण करण्यास सागू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोवावॅक्सला इतर कोणत्याही देशांनी मंजुरी दिलेली नाही. कोवावॅक्स लसीच्या पहिल्यांदा वयोवृद्ध व्यक्ती किंवा मध्यम वयोगटातील नागरिकांवर चाचण्या करण्यास सांगितलं जाऊ शकते. त्यानंतर लहान मुलांवर कोरोना लसीच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली जाऊ शकते.
मुंबईतील 51.18 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडी
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये करण्यात आलेल्या सेरो सर्व्हेतून 1 ते 18 वयोगटातील 51.18 टक्के मुलांच्या शरीरात कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. मुंबईत यापूर्वी करण्यात आलेल्या सेरो सर्व्हेच्या तुलनेत एप्रिल ते जून दरम्यान करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये अँटीबॉडी आढळणाऱ्या मुलांचं प्रमाणं वाढलं आहे. हा सर्व्हे 1 एप्रिल ते 15 जून दरम्यान करण्यात आला होता. प्रयोगशाळेत 2176 जणांचे नमुने तपासण्यात आले होते.
संबंधित बातम्या:
Mumbai Fake vaccination scam | कांदिवलीत बोगस लसीकरण प्रकरण, आरोपीला बारामतीतील लॉजवरुन अटक
Uday Samant | लसीकरण पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये उघडणे शक्य नाही : उदय सामंत
(Serum Institute of India application for conduct clinical trials of Covavax on children Government panel recommends serum first trial on adults)