जिऱ्याचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं खरं पण, उद्भवतात अनेक समस्या!

आरोग्यासाठी फायदेशीर असूनही ते आरोग्यास हानी पोहोचवण्याचे ही काम करते. होय, वजन कमी करण्यासाठी बरेच लोक जिऱ्याचे पाणी पितात किंवा जिऱ्याचे सेवन करतात. ज्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

जिऱ्याचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं खरं पण, उद्भवतात अनेक समस्या!
JeeraImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 4:52 PM

जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी लोक जिऱ्याचे सेवन करतात. जिऱ्यात Vitamin E, A, लोह, तांबे अशी खनिजे आढळतात, जी शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात. आरोग्यासाठी फायदेशीर असूनही ते आरोग्यास हानी पोहोचवण्याचे ही काम करते. होय, वजन कमी करण्यासाठी बरेच लोक जिऱ्याचे पाणी पितात किंवा जिऱ्याचे सेवन करतात. ज्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. जिऱ्याचे सेवन केल्याने शरीराचे काय नुकसान होऊ शकते हे येथे आम्ही तुम्हाला सांगतो.

जिऱ्याच्या अतिसेवनाने होऊ शकते

छातीत जळजळ

पोटातील गॅससाठी जिरे फायदेशीर आहे. पण जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे जिऱ्याचे जास्त सेवन करणे टाळावे.

जास्त रक्तस्त्राव

महिलांनी जिऱ्याचे जास्त सेवन करू नये. कारण जिरे खाल्ल्याने मासिक पाळीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. होय, मासिक पाळीच्या काळात जिऱ्याचे सेवन केल्यास जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात महिलांनी याचे सेवन करू नये.

उलट्यांची समस्या

जिऱ्याच्या पाण्याच्या अतिसेवनामुळे मेंदूशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यासोबतच तुम्हाला उलट्यांचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे जिऱ्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

यकृत खराब होणे

जिऱ्यात असलेले तेल आपल्या यकृताला हानी पोहोचवू शकते. अशावेळी जर तुम्ही याचे जास्त सेवन केले तर किडनी किंवा यकृत खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जिऱ्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे, ती स्वीकारण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.