Sleeping without Clothes: उन्हाळ्यात विवस्त्र झोपत असाल, तर सावधान! होऊ शकते मोठे नुकसान, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणातात?

अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसांत गरम होत असल्याने लोक कपड्यांविना अर्थात 'विवस्त्र’ झोपणे पसंत करतात. तुम्ही देखील असे करत असाल, तर आताचा सावध व्हा! यामुळे तुमच्या आरोग्याला मोठे नुकसान होऊ शकते.

Sleeping without Clothes: उन्हाळ्यात विवस्त्र झोपत असाल, तर सावधान! होऊ शकते मोठे नुकसान, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणातात?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 4:17 PM

मुंबई : अनेकदा उन्हाळ्याच्या दिवसांत गरम होत असल्याने लोक कपड्यांविना अर्थात ‘विवस्त्र’ झोपणे पसंत करतात. तुम्हीदेखील असे करत असाल, तर आताच सावध व्हा! यामुळे तुमच्या आरोग्याला मोठे नुकसान होऊ शकते. द सनच्या वृत्तानुसार, बुपाच्या क्रॉमवेल हॉस्पिटलमधील लीड स्लीप फिजिओलॉजिस्ट ज्युलियस पॅट्रिक (Julius Patrick) म्हणाल्या की, ‘कपड्यांशिवाय झोपल्यामुळे, तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब होऊ शकते.’(Sleeping without clothes in summer can cause big damage, know what experts say)

ज्युलियस पॅट्रिक म्हणाल्या की, ‘प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही कपड्यांशिवाय झोपता, तेव्हा घाम शरीरावर जमा होतो आणि मग तो शरीरावरच राहतो. यामुळे अनेक अडचणी उद्भवू शकतात आणि तुमची झोपदेखील विचलित होऊ शकते.’

झोपेच्या खराब गुणवत्तेचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे मेंदूला योग्य प्रमाणात विश्रांती मिळत नाही आणि त्यामुळे लोक ताणतणाव आणि मानसिक समस्यांना बळी पडतात. या व्यतिरिक्त कमी झोपेचा नकरात्मक परिणाम आपल्या पाचक प्रणालीवर देखील होतो.

तज्ज्ञ काय म्हणतात?

या अहवालानुसार, यापूर्वी न्यूरोलॉजिस्ट आणि स्लीप फिजीशियन डॉ. गाय लेशझिनर (Dr Guy Leschziner) यांनी एका रेडिओच्या कार्यक्रमात असा दावा केला होता की, विवस्र झोपण्यामुळे तुमच्या शरीराला जास्त उष्णता मिळते. कपड्यांशिवाय झोपण्यापेक्षा कपडे घालून झोपी जाणे अधिक चांगले, असा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे (Sleeping without clothes in summer can cause big damage, know what experts say).

तज्ज्ञांनी असे देखील सुचवले आहे की, उन्हाळ्याच्या हंगामात झोपताना आपण सूती वस्त्रांसारखी नैसर्गिक वस्त्र परिधान करावीत. सूती कपडे परिधान केल्यामुळे आपल्या शरीरावर घाम साचून राहत नाही आणि यामुळे आपणास जास्त थंड वाटू शकते.

कमी कपडे उत्तम पर्याय!

तज्ज्ञ जरी उन्हाळ्यात कपडे घालून झोपायचा सल्ला देत असले तरी, सामान्य दिवसांत कपड्यांशिवाय अर्थात विवस्त्र झोपणे खूप फायदेशीर आहे. बर्‍याच अभ्यास आणि संशोधनात असा दावा केला गेला आहे की, विवस्त्र किंवा कमी कपड्यांमध्ये झोपल्यामुळे आपली त्वचा मुक्तपणे श्वास घेऊ शकते, ज्यामुळे आपली त्वचा देखील सुंदर बनते. याशिवाय, कपडे घालून झोपल्यामुळे शरीरात बॅक्टेरियांच्या वाढीचा धोका असतो आणि कमी कपडे घालून झोपल्यामुळे आपले प्रायव्हेट पार्ट अधिक निरोगी आणि सुरक्षित राहतात.

(Sleeping without clothes in summer can cause big damage, know what experts say)

हेही वाचा :

Sleeping Disorder | कमी झोपेमुळे ‘स्लीप एपनिया’चा धोका, जाणून घ्या लक्षणांबद्दल…

Health Food | शांत झोप मिळवण्यासाठी आहारात ‘या’ घटकांचा समावेश आवश्यक!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.