पहिले वाटले वजन वाढले… नंतर भयंकर सत्य समोर आले
कोरोना काळात घरात बसून अनेकांचे वजन वाढल्याचे आपण पाहिले आहे. परंतु याबाबत एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. याच काळात एका महिलेचे वजन हळूहळू वाढत होते. त्यानंतर जेव्हा तपासणीसाठी तिचे अल्ट्रासाऊंड करण्यात आले तेव्हा एक भयंकर प्रकार समोर आला. तिच्या पोटातून तब्बल 8.2 किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तिला कॅन्सर झाल्याचे निदान झाले.
कोरोना महामारीमुळे, शारीरिक हालचाली कमी झाल्यात. घरुनच काम करायला सांगण्यात आल्याने श्रम कमी व खाणे जास्त झाल्यामुळे अनेकांचे पोट (stomach) व वजन वाढणे साहजिकच होते. असाच प्रकार एका महिलेसोबत घडला होता. जास्त खाल्ल्यामुळे तिचे पोट हळूहळू बाहेर येत होते. अचानक वजन वाढल्याने (weight gain) महिलेने डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानंतर डॉक्टरांनी महिलेचे ‘अल्ट्रासाऊंड’ केले तेव्हा भयंकर सत्य समोर आले. तिला कॅन्सर झाल्याचे समोर आले. कॅन्सरचे (cancer) निदान झाल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता ती पूर्णपणे बरी आहे. या महिलेने तिचा संपूर्ण प्रवास एका व्हिडिओद्वारे शेअर केला आहे.
दक्षिण इंग्लंड येथील 32 वर्षीय चॅनेल मेसनला तिचे पोट वाढल्याचे जाणवत होते. लॉकडाऊनमध्ये तिने खूप खाल्ल्याने पोटाला सुज आल्याचा समज झाला होता. त्यानंतर तिच्या पोटाचा आकार वाढू लागल्याने ती नोव्हेंबरमध्ये डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केले. दरम्यान या दुर्दम्य आजारावर सदर महिला इतरांमध्ये जनजागृती देखील करीत आहे.
अन् धक्कादायक प्रकार आला समोर
तिच्या अंडाशयात 13 इंच (32 सें.मी.) रुंद असा गोळा आढळला होता जो फुटबॉलपेक्षा मोठे आणि बॉलिंग बॉलपेक्षा जड असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले. अंडाशयात एवढी मोठी सिस्ट पाहून डॉक्टरांनी त्याची पुढील तपासणी केली, ज्यामध्ये महिलेला गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे उघड झाले, ज्यामुळे पोटात दुर्मिळ प्रकारची गाठ विकसित होते.
दरवर्षी अनेक महिलांना होते लागण
यूकेमध्ये सुमारे 200 आणि यूएसमध्ये 600 महिलांना दरवर्षी म्युकिनस ओवेरियन गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होते. या कॅन्सरमुळे मोठी गाठ निर्माण होते, ज्यामध्ये 80 टक्के प्रकरणांमध्ये कॅन्सर आणखी पसरण्याआधीच शोधला जाऊ शकतो. याचा अर्थ केमोथेरपी न करता केवळ शस्त्रक्रियेनेच उपचार करता येतात.
इतर बातम्या
Health Care : जाणून घ्या लवंगचे जबरदस्त फायदे आणि अधिक सेवन करण्याचे तोटे!
Rajesh Tope | गुढीपाडव्याला मास्कमुक्ती होणार की नाही? काय म्हणाले आरोग्य मंत्री राजेश टोपे?