Stretch Marks | स्ट्रेच मार्क्समुळे वैतागलात? हवे तसे कपडे घालता येत नाही? करा ‘हे’ घरगुती उपाय
स्ट्रेच मार्क्स गर्भवती महिलांना असतात आणि तेही पोटाला, असा काहीसा आपला समज आहे. पण स्ट्रेच मार्क्स हे स्त्री, पुरुष यांना कोणालाही असतात. आणि कुठल्याही वयात येऊ शकतात. अनेक महिला स्ट्रेच मार्क्समुळे आपले आवडीचे कपडे घालू शकत नाही. या स्ट्रेच मार्क्सवर काही घरगुती उपाय केले तर तुम्हाला नक्की फायदा होईल.
स्ट्रेच मार्क्स (Stretch Marks) हे गर्भवती महिलांना (Pregnant Women) असतात असं नाही तर स्त्री, पुरुष यांनाही कुठल्याही वयात येऊ शकतात. स्ट्रेच मार्क्स यांचं प्रमुख कारण आहे वाढलेले वजन (Weight) किंवा कमी झालेले वजन. यामुळे तुमच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स येतात. स्ट्रेच मार्क्स येण्याचे अनेक कारणं आहेत. स्ट्रेच मार्क्स हे पोट, कंबर आणि मांड्यांवर येतात.
स्ट्रेच मार्क्स म्हणजे नेमकं काय?
वजन आणि मासपेशी यांचं प्रमाण अचानक वाढल्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागात स्ट्रेच मार्क्स येतात. लाल, पांढऱ्या रंगाच्या रेषा या शरीरावर दिसतात. त्यामुळे त्वचा खराब दिसायला लागते. त्यामुळे अनेक महिला आपल्या आवडीचे कपडे घालण्यास लाजतात. हे स्ट्रेच मार्क्स कायमचे जात नाही, पण हो… काही घरगुती उपाय केल्यास ते हलके होऊ शकतात.
एरंडेल तेल उपयुक्त
स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी एरंडेल तेल बेस्ट (Best) आहे. या तेलात ओमेगा-9 फॅटी अँसिड असल्याने त्वचा मॉइश्चरायझ (Moisturize) आणि कंडिशनिंग (Conditioning) होते. या तेलाचा वापर करु आपण कशाप्रकारे स्ट्रेच मार्क्स कमी करु शकतो ते पाहूयात
1. एरंडेल तेल आणि खोबरेल तेल –
खोबरेल तेल आणि एरंडेल तेल हे त्वचेसाठी उत्तम आहेत. यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते. यासाठी एका वाटीत एरंडेल तेल आणि खोबरेल तेल सम प्रमाणात मिक्स करा. आणि या तेलाने रात्री झोपण्यापूर्वी स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी मसाज करा. हा मसाज अगदी रोज करा, या उपायाने तुम्हाला नक्की फायदा होईल.
2. एरंडेल तेल आणि लवंग एसेंशियल ऑयल –
एका वाटीत लवंग एसेंशियल ऑयलचे 3 थेंब आणि 1 चमचे एरंडेल तेल मिक्स करा. आणि या तेलाने स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी मसाज करा. हा मसाजही रोज रात्री करा.
3. एरंडेल तेल आणि कोरफड –
1 टेस्पून ताजे कोरफडचा गर आणि 1 टेस्पून एरंडेल तेल मिक्स करा. या मिश्रणाने स्ट्रेच मार्क्सच्या ठिकाणी साधारण 10 मिनिटं मसाज करा. हा उपाय पण रोज रात्री झोपण्यापूर्वी करा.
हेही करु उपाय गुणकारी
- ऑर्गन ऑइलने दररोज मसाज करणे.
- दररोज लिंबाचा रस स्ट्रेच मार्क्सवर लावावा.
- स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर अंड्यामधील पांढरा भाग लावावा.
- बटाट्याचा रसही स्ट्रेच मार्क्ससाठी उपयुक्त
- ऑलिव्ह ऑइलचा मसाज
- साखर, ऑलिव्ह ऑइल आणि लिंबाचा रस या मिश्रणाने 10 मिनिटं मसाज करा.
इतर महत्त्वाच्या बातम्या –
Important | कोरोनाचा स्पर्मवर हल्ला! संशोधनातून खुलासा, कोरोनातून बरे झालेल्यांसाठी महत्त्वाची बातमी
रोजच्या या चुकांमुळे हात कोरडे होतात, मग ‘या’ प्रकारे घ्या काळजी!
शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!
घट्ट कपड्यांमुळे Spermमध्ये घट? टाईट जीन्स, ट्राऊझरसोबत आत घट्ट अंडरवेअर घालणाऱ्यांनो, हे वाचाच!