Hair Care: ‘या’ व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे केसांमध्ये होऊ शकतात ‘या’ समस्या

केसांच्या समस्येमुळे अनेक जण त्रस्त असतात. पण काही वेळा व्हिटॅमिन्स अर्थात जीवनसत्वांच्या अभावामुळे केसात कोंड्याचा त्रास होऊ शकतो. कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे ही समस्या होऊ शकते हे जाणून घेऊया.

Hair Care: 'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे केसांमध्ये होऊ शकतात 'या' समस्या
'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे केसांमध्ये होऊ शकतात 'या' समस्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 3:04 PM

नवी दिल्ली: शरीरामध्ये पोषक तत्वांची (nutrition) कमतरता असेल तर त्याचा परिणाम आरोग्य, त्वचा आणि केसांवर दिसून येतो. केस निरोगी ठेवण्यासाठी काळजी घेण्याबरोबरच शरीरात योग्य प्रमाणात पोषक तत्वं असणेही गरजेचे असते. येथे आपण कोंड्याबद्दल बोलत आहोत, जे केस गळण्याचे, तसेच ते कोरडे आणि निर्जीव होण्याचे कारण असू शकते. घाण, ओलावा, घाम आणि धूळ किंवा प्रखर सूर्यप्रकाश यामुळे केसात कोंडा होऊ शकतो. पण काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे (vitamin deficiency) देखील कोंडा (dandruff) होऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोंड्याची समस्या उद्भवू शकते. जाणून घेऊया..

बायोटिन अथवा व्हिटॅमिन बी 7

व्हिटॅमिन बी 7 हे बायोटिन नावाने ओळखले जाते आणि स्काल्प निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरते. बायोटिनचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यामुळे आरोग्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते. या जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि केसांचे नुकसान होते. त्याची कमतरता दूर करण्यासाठी बदाम, मांस, मासे आणि संपूर्ण धान्याचे सेवन करावे.

व्हिटॅमिन सी ची कमतरता

त्वचेप्रमाणेच केसांच्या चांगल्या वाढीसाठी शरीरात कोलेजन असायला हवे. कोलेजनच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन सीचा उपयुक्त ठरते. शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर केस गळणे, कोंडा होणे, केस पातळ होणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिनस सीच्या कमतरतेमुळे सेबोरिक हा त्वचारोग होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत कोंडा वाढू शकतो. व्हिटॅमिन सी शरीराला मिळावे यासाठी लिंबूवर्गीय आंबट फळांचे सेवन सरू करावे.

व्हिटॅमिन डी ची कमतरता

व्हिटॅमिन डी हे देखील हे एक आवश्यक जीवनसत्व देखील आहे, ज्याच्या कमतरतेमुळे केवळ हाडेच नव्हे तर केस देखील अशक्त होतात. व्हिटॅमिन डीची कमतरता हे कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण आहे. आणि आपण सूर्यप्रकाशाद्वारे त्यावर मात करू शकतो.

तसे पाहिले तर कॉड लिव्हर ऑइल, मशरुम किंवा फॅटी फिशच्या माध्यमातूनही शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होऊ शकते. केसांची निगा राखण्याबरोबरच सामान्य जीवनातही बदल करायला हवेत. ताण-तणाव टाळायला हवा, कारण त्यामुळे केसांची समस्या सुरू होऊ शकते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.