भविष्यात ओवेरियन कॅन्सर होऊ नये म्हणून महिलांनो चुकून ही या कारणांकडे करू नका दुर्लक्ष!

ओवेरियन कॅन्सर असा हा एक आजार आहे जो गंभीर झाल्यास व्यक्तीचा जीव सुद्धा घेऊ शकतो. याची लक्षणे इतकेच सर्वसामान्य असतात की अनेकदा महिलांना याच्या लक्षणं बद्दल कळत सुद्धा नाही.

भविष्यात ओवेरियन कॅन्सर होऊ नये म्हणून महिलांनो चुकून ही या कारणांकडे करू नका दुर्लक्ष!
भविष्यात ओवेरियन कॅन्सर होऊ नये म्हणून महिलांनो चुकून ही या करणांकडे करू नका दुर्लक्ष!
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 1:03 AM

मुंबई : ओवेरियन कॅन्सर म्हणजे (Ovarian Cancer) गर्भाशयाचा कॅन्सर. हा असा आजार आहे की जो महिलांचे गर्भाशय आणि ट्युबला नष्ट करु शकतो. या आजारांमध्ये महिलांच्या गर्भाशयामध्ये छोट्या छोट्या आकाराच्या गाठी (Ovarian cysts) तयार होतात. या आजाराची लक्षणे इतकी सर्वसामान्य असतात की याबद्दल अनेक महिलांना कळत देखील नाही आणि त्यांना कोणतेही संकेत सुद्धा मिळत नाहीत. म्हणूनच अनेकदा या आजाराची लक्षणे जाणवत असली तरी अनेक महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. आपणास सांगू इच्छितो की कॅन्सर (Cancer) हा असा आजार आहे ज्यावर जर आपण वेळेवर उपचार केले नाहीत त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरातील अन्य अवयवांवर सुद्धा होऊ शकतो. तसेच भविष्यात आपला मृत्यू देखील होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया गर्भाशयाचा कॅन्सर बद्दल काही लक्षणे जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रकारचे संकेत जाणवू लागल्यास या आजारावर वेळीच उपचार करून कॅन्सरला रोखता येऊ शकेल.

मासिक पाळी वेळेवर न येणे

हल्ली मासिक पाळी वेळेवर न येणे ही समस्या सर्वसाधारण झालेली आहे. बहुतेक वेळा अति लट्ठपणा, पीसीओडी, थायरॉईड यासारख्या समस्या महिलांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच बदललेल्या जीवनशैलीच्या कारणामुळे सुद्धा कमी वयातच मासिक पाळी येणे, वेळेवर न येणे हे नित्यनेमाचे कारण झालेले आहे. असे नेहमी घडणे चांगले नाही. भविष्यात हे लक्षण गर्भाशयाच्या कॅन्सरचे देखील असू शकते. याबद्दल अनेक महिलांना माहिती नसते. जर तुम्हाला मासिक पाळी न येण्याची समस्या खूप दिवसापासून असेल. तसेच मासिक पाळी दिवसांमध्ये रक्त प्रवाह जास्त होत असेल. कंबर आणि योनी आसपास भागांमध्ये वेदना जाणवत असतील तर अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांना अवश्य भेट द्यायला हवी व आवश्यक ती तपासणी सुद्धा करायला पाहिजे.

पोट फुगणे

काही महिलांना गॅसची समस्या असते. यामुळे सुद्धा अनेकदा त्यांचे पोट फुगल्यासारखे वाटते. या समस्येकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात परंतु हा त्रास तुम्हाला खूप दिवसापासून असेल तर अशावेळी या त्रासाला सामान्य अजिबात समजू नका यासाठी आपल्याला तज्ज्ञ मंडळी व डॉक्टरांचा सल्ला अवश्य द्यायला पाहिजे. आंबट ढेकर, बद्धकोष्टता, पोट वेळेवर साफ न होणे, अपचन, ऍसिडिटी आणि संभोग करतेवेळी वेदना होणे इत्यादी ओवेरियन कॅन्सरचे लक्षण सुद्धा असू शकतात.

लघवी संबंधित समस्या

लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी लागणे, लघवी करते वेळी मूत्राशयामध्ये वेदना होणे इत्यादी समस्या महिलांमध्ये कॉमन पाहायला मिळतात. अनेक महिलांना युरिन इन्फेक्शनची समस्या अनेकदा होत असते. जर तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल तर या त्रासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांशी बातचीत करून योग्य तो उपचार करा. जर या त्रासाकडे आपण दुर्लक्ष केले तर भविष्यात तुम्हाला गर्भाशयाचा कॅन्सर देखील होऊ शकतो. जर वेळेवर आपल्याला लक्षणे जाणवल्यास आपण योग्य तो उपचार करून या आजारापासून कायमस्वरूपी सुटका मिळू शकते.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

इतर बातम्या

वजन कमी करायचे आहे? तर या ‘पाच’ सवयींना बनवा तुमच्या आयुष्याचा भाग; जाणून घ्या फायदे

भविष्यात ओवेरियन कॅन्सर होऊ नये म्हणून महिलांनो चुकून ही या करणांकडे करू नका दुर्लक्ष!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.