Iron : रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

शरीराला लोहाची अत्यंत आवश्‍यकता असते. अनेकांच्या रक्तात लोहाची कमतरता असल्याने त्यांना यासाठी उपचार घ्यावे लागत असतात. परंतु आपण आपल्या आहारात काही महत्वाच्या लोहयुक्त घटकांचा समावेश केल्यास ही समस्या दूर होऊ शकतो.

Iron : रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा
Iron Rich Foods :
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 12:49 PM

मुंबई : आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक घटकांची आवश्‍यकता भासत असते. विविध पदार्थांचा आहारात समावेश केल्याने यातून आपल्याला मिनिरल्स, व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम आदी तत्व मिळत असतात. परंतु असमतोल आहारातून अनेकदा आवश्‍यक असलेली पोषक तत्वे शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होत असतात. आपल्याला नेहमी हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये पालक आणि ब्रोकोलीसारख्या भाज्यांचा समावेश आहे. या भाज्यांमध्ये भरपूर लोह (iron) असते. लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, त्यांचा आहारात (diet) समावेश करणे योग्य असते. याशिवाय तुम्ही आहारात आयर्न समृद्ध इतर अनेक पदार्थांचाही समावेश करू शकता. लोह शरीरासाठी आवश्यक असते. हिमोग्लोबिनसाठी हे अत्यंत महत्वाचे असते. यामुळे फुफ्फुसातून इतर अवयवांमध्ये ऑक्सिजन (oxygen) वाहून नेला जातो. शरीरात लोहाची कमतरता असल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळणार नाही आणि तुम्हाला दम लागणे आणि थकवा येऊ शकतो.

हे पदार्थ खा आणि रक्तातील लोहाची कमतरता दूर करा

  1. अंड्याचा बलक : या नाश्‍त्यातून प्रथिनेच नाही तर भरपूर प्रमाणात लोह मिळत असते. अंड्यातील पिवळ्या बलकात सुमारे 1.89 मिलीग्राम लोह असते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होत असते. शिवाय यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
  2. ब्रोकोली : ब्रोकोली लोहाचा चांगला स्रोत आहे. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, ओमेगा 3, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि फॉस्फरस यांसारखे काही इतर आवश्यक पोषक घटक असतात. ही भाजी हृदयासाठीही चांगली आहे. खराब कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करत असते. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. यामुळे आपली पचनसंस्था निरोगी राहते. बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.
  3. हरभरा : हरभरा हा खनिजांनी परिपूर्ण आहे. वजन नियंत्रित ठेवण्यास याची मोठी मदत होत असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याने अनेक आजार दूर होतात. याचा रोज सॅलेडमध्ये वापर होउ शकतो.
  4. पालक : पालकाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. युएसडीए डेटानुसार, सुमारे 100 ग्रॅम कच्च्या पालकामध्ये 2.7 मिलीग्राम लोह असते. आपण आपल्या आहारात पालकाचा अनेक प्रकारे समावेश करू शकतो.
  5. भोपळ्याच्या बिया : भोपळ्याच्या बियांमध्ये लोहासह इतर जीवनसत्त्वे आहे. त्यात ए, सी, के बी 9 यांचा समावेश होतो. याशिवाय पोटॅशिअम, मॅंगनीज आणि कॅल्शिअम सारखी खनिजे भरपूर असतात.
  6. सोयाबीन : सोयाबीनमध्येही भरपूर लोह आहे. तसेच त्यात, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. पचनाच्या समस्यांवर मात करण्यास सोयाबीनमुळे मदत होते. यामुळे आपली प्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होते.
  7. मांस : मांस लोहाच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. नियमितपणे मांस खाल्ल्याने अशक्तपणा दूर होऊ शकतो. त्याच प्रमाणे यातून आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढीस लागते, जे लोक मांसाहारी आहेत त्यांनी आपल्या आहारात याचे योग्य प्रमाण ठेवावे.

इतर बातम्या

तुम्हीही फ्रिजमधील पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा… समोर आले गंभीर परिणाम

केसांच्या समस्यांवर कोरफड ठरते रामबाण उपाय, असा करा वापर…

काय सांगतात तुमचे डोळे? जाणून घ्या एका क्लिकवर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.