लोकांनो, दात सांभाळा, लवकर दात पडल्यास स्मरणशक्ती कमकुवत होते; वाचा सर्व्हे काय सांगतो

दातांच्या संदर्भात एक नवं संशोधन पुढे आलं आहे. हे संशोधन मजेदार आणि तितकच महत्त्वाचं आहे. या संशोधनानुसार लवकर दात पडल्यास त्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होतो. (Tooth Loss Can Cause Loss Of Memory And Heart Threat)

लोकांनो, दात सांभाळा, लवकर दात पडल्यास स्मरणशक्ती कमकुवत होते; वाचा सर्व्हे काय सांगतो
teeth
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 9:41 AM

नवी दिल्ली: दातांच्या संदर्भात एक नवं संशोधन पुढे आलं आहे. हे संशोधन मजेदार आणि तितकच महत्त्वाचं आहे. या संशोधनानुसार लवकर दात पडल्यास त्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होतो. कमी वयात दात पडल्यास स्मरणशक्ती कमकुवत होत असल्याचं या सर्व्हेत म्हटलं आहे. तसेच ज्यांचे लवकर दात पडतात त्यांना डिमेंशियाचा धोका उद्भवण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (Tooth Loss Can Cause Loss Of Memory And Heart Threat)

अमेरिकेच्या न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीच्या संशोधनातून हा खुलासा झाला आहे. स्मरणशक्ती कमी होणाऱ्या आजाराला डिमेंशिया असं म्हटलं जातं. लवकर दात पडल्यास हा आजार उद्भवतो. व्यक्तिची विचार करण्याची क्षमता कमी होते, असं या संशोधनात म्हटलं आहे.

अक्कलदाढेच्या आजारामुळे स्मरणशक्तीवर परिणाम

दात आणि स्मरणशक्तीचा थेट काही संबंध आहे का? याचं तंतोतंत उत्तर अजून मिळालेलं नाही. मात्र, दात आणि स्मरणशक्तीचा काही ना काही संबंध असणारच. उदाहरणार्थ दात तुटल्याने अन्न चावून खाताना त्रास होत असतो. त्यामुळे शरीराला पोषक तत्त्व मिळत नाही. परिणामी त्याचा स्मरणशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असते. किंवा अक्कलदाढ पडण्याचा आणि स्मरणशक्तीचा काही संबंध असू शकतो, असं या सर्व्हेत म्हटलं आहे.

डिमेंशियाचा धोका 1.28 टक्के

रिसर्च दरम्यान 30,076 लोकांवर झालेल्या 14 अभ्यासांचं विश्लेषण करण्यात आलं. त्यात 4,689 लोकांची विचार करण्याची क्षमता जवळजवळ संपुष्टात आली होती. ज्या वयस्क लोकांचे दात पडले आहेत. त्यांना अल्झायमरचा धोका 1.48 टक्के वाढल्याचा निष्कर्ष यावेळी काढण्यात आला. तर या लोकांमध्ये डिमेंशिया होण्याची 1.28 टक्के शक्यता वर्तवण्यता आली.

ओरल हेल्थकडे लक्ष देणं आवश्यक

दरवर्षी अल्झायमर आणि डिमेंशिया झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आयुष्यभर ओरल हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं आहे. डिमेंशिया झाल्यावर मेंदूचं काम करणं थांबतं. तसेच मेंदूच्या कोशिका डॅमेज होत असतात, असं संशोधक डॉ. बे. वू यांचं म्हणणं आहे.

छोट्या गोष्टीही लक्षात राहत नाही

65 वर्षाच्या वयातील प्रत्येक 14 पैकी एक व्यक्ती आणि 80 वर्षाच्या प्रत्येक सहा व्यक्तिंपैकी एका व्यक्तिला डिमेंशियाचा आजार असतो. अल्झायमर झालेल्या व्यक्तिची विचार करण्याची शक्ती क्षीण होते. परिस्थिती बिघडल्यावर व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही. या व्यक्तिच्या स्वभावावर आणि त्याच्या संबंधांवरही परिणाम होत असल्याचं हे संशोधन सांगतं. (Tooth Loss Can Cause Loss Of Memory And Heart Threat)

संबंधित बातम्या:

गर्भधारणेदरम्यान चालण्याचे बरेच फायदे , पण ‘या’ गोष्टींची काळजी घेणंही खूप महत्वाचं!

Monsoon Health Tips : पावसाळ्याच्या हंगामात ‘हे’ पदार्थ खाऊ नका!

Benefits Of Pine Essential Oil : एसेन्शियल तेल आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, वाचा याबद्दल अधिक!

(Tooth Loss Can Cause Loss Of Memory And Heart Threat)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.