लोकांच्या मेंटल वेलबीइंगच्या बाबतीत टिअर 2 शहरे तुलनेने आघाडीवर: टीआरए रिसर्च

टीआरए रिसर्च या कन्झ्युमर इन्साइट आणि ब्रँड अनॅलिटिक्स कंपनीने जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दुसरा मेंटल वेलबीइंग अहवाल सादर केला आहे. या संशोधनामध्ये भारतातील शहरी भागातील नागरिकांच्या मेंटल वेलबीइंगचा वेध घेण्यात आला आणि त्यासाठी जुलै आणि सप्टेंबर 2021 या कालावधीत 16 शहरांतील 1003 जणांना सहभागी करुन घेण्यात आले.

लोकांच्या मेंटल वेलबीइंगच्या बाबतीत टिअर 2 शहरे तुलनेने आघाडीवर: टीआरए रिसर्च
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 2:01 PM

मुंबई : टीआरए रिसर्च या कन्झ्युमर इन्साइट आणि ब्रँड अनॅलिटिक्स कंपनीने जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दुसरा मेंटल वेलबीइंग अहवाल सादर केला आहे. या संशोधनामध्ये भारतातील शहरी भागातील नागरिकांच्या मेंटल वेलबीइंगचा वेध घेण्यात आला आणि त्यासाठी जुलै आणि सप्टेंबर 2021 या कालावधीत 16 शहरांतील 1003 जणांना सहभागी करुन घेण्यात आले. या अभ्यासामध्ये नागरिकांची आरोग्यविषयक चिंता, अर्थव्यवस्थाविषयक चिंता, कौटुंबीक चिंता आणि आर्थिक चिंता आणि त्यांचा सामना करण्याची नागरिकांची क्षमता यांचीही पाहणी करण्यात आली.

टिअर 2 शहरांनी उत्तम मेंटल वेलबीइंग गुण नोंदवले आहेत. कोचीने MWBI 2021 मध्. सर्वाधिक, म्हणजे +177% (MWBI 2020 च्या तुलनेत 131% अधिक) गुण नोंदवले आहेत. लखनौचे गुण +147%, आणि चंडीगडचे +144% MWBI असून, त्यांच्या गुणांमध्ये फारच कमी फरक आहे आणि त्यामध्ये अगोदरच्या वर्षाच्या अहवालाच्या तुलनेत अंदाजे 300% वाढ झाली आहे. याबरोबरच, इंदूर (+113% MWBI) आणि जयपूर (+101% MWBI) यांनी अतिशय चांगले मेंटल वेलबीइंग गुण नोंदवले असून, आघाडीच्या तीन शहरांमध्ये समाविष्ट होण्याबाबत ही शहरे आशादायी आहेत.

मानसिक आरोग्याबाबत सर्वात वाईट गुण कोलकाता (+9% MWBI), अहमदाबाद (+3% MWBI) आणि चेन्नई (-8% MWBI) या शहरांनी नोंदवले आहेत. या तिन्ही शहरांनी मानसिक आरोग्याच्या बाबत संतुलन दाखवले आहे, परंतु चेन्नईला मिळालेले नकारात्मक गुण चेन्नईतील रहिवाशांची त्यांच्या चिंता हाताळण्याची असमर्थता दाखवतात.

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने टीआरएचा करोनाव्हायरस मेंटल वेलबीइंग इम्पॅक्ट अहवाल सादर करताना, टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. चंद्रमौली यांनी नमूद केले, “गेल्या वर्षी करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये, भारताभरातील लोकांमध्ये सर्वाधिक चिंता ‘आर्थिक चिंता’ होती व तिचे प्रमाण 60% होते. MWBI 2021 मध्ये ही चिंता 47% पर्यंत कमी झाली आहे. ‘कोटुंबीक चिंता’ समान राहिली असून या वर्षी फक्त 1% म्हणजे 53% पर्यंत कमी झाली आहे, तर ‘आरोग्यविषयक चिंता’ 49% MWBI आणि ‘अर्थव्यवस्थाविषयक चिंता’ 36% आहे आणि हे प्रमाण समान राहिले असून गेल्या वर्षीपेक्षा केवळ 1% घटले आहे.”

“महासाथीमुळे अधिकाऱ्यांना किंवा कंपन्यांना मानसिक आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता आलेले नाही. मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम ही दीर्घकालीन समस्या आहे आणि याचा परिणाम व्यक्ती, कॉर्पोरेट आणि प्रशासन यांच्याशी असलेल्या नात्यामध्ये विश्वास निर्माण करण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो “, असे चंद्रमौली यांनी स्पष्ट केले.

“नजिकच्या काळामध्ये कोणते उपक्रम करायला आवडतील, असा प्रश्नही संशोधनामध्ये लोकांना विचारण्यात आला. यावर मिळालेली उत्तरे आश्चर्यजनिक नव्हती. जवळडवळ 38% जणांनी उत्तर दिले की त्यांना मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत गेट टुगेदर करायचे आहे. अनेक ठिकाणे आता लोकांसाठी खुली होऊ लागली असली तरी सुटीवर जाणे किंवा अगदी धार्मिक स्थळी जाणे ही उपक्रम ‘राबवण्याची शक्यता/अधिक शक्यता’ आहे, असे केवळ 28% जणांनी सांगितले. निवांतपणासाठी प्रवास करण्याची इच्छा 25% जणांनी व्यक्त केली, तर सहभागी झालेल्या 21% जणांना खरेदीसाठी मॉलमध्ये जायची इच्छा आहे. चित्रपटगृहांना आणखी काही काळ प्रेक्षकांची वाट बघावी लागण्याची शक्यता आहे, कारण केवळ 8% जणांनी हा उपक्रम नजिकच्या काळात ‘राबवण्याची शक्यता/अधिक शक्यता’ असल्याचे सांगितले आहे”, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

सावधान! कोरोनामधून बरे झालेल्यांना डेंग्यू आणि फ्लूचा धोका वाढला, वाचा सविस्तर!

Weight Loss : एका महिन्यात किती वजन कमी करणे योग्य? वाचा तज्ज्ञांचे मत!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.