Turmeric side effects : या कारणांमुळे हळदीचे अति सेवन ठरू शकते धोकादायक

हळदीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात, मात्र याच हळदीचे अति सेवन केल्यास ते आरोग्याला धोकादायक देखील ठरू शकते, हळदीमध्ये असे कोणते गुणधर्म आहेत? की ज्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते ते आपण जाणून घेणार आहोत.

Turmeric side effects : या कारणांमुळे हळदीचे अति सेवन ठरू शकते धोकादायक
हळदीचे फायदे
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 6:23 PM

TurmericSide effects : हळद हा मसाल्याचा असा एक घटक आहे, ज्याचा समावेश एखाद्या पदार्थामध्ये केल्यास त्यामुळे चवेत काहीही फरक पडत नाही. मात्र हळदीमध्ये अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे रोजच्या जेवणाच्या पदार्थांमध्ये हळदीचा समावेश केला जातो. हळद हे एक उत्तमप्रकारचे अँटी-बॅक्टेरियल आहे सोबत हळदीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, आयरन, प्रोटिन यांचा देखील समावेश असतो. हळदीमध्ये फायबर मोठ्याप्रणात असल्याने ती अन्न पचनाच्या कामात देखील मदत होते. हे झाले हळदीचे फयदे. मात्र हळदीमध्ये असे देखील काही गुणधर्म आहेत, ज्यामुळे हळदीचे अतिसेवन हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आजा आपण हळीदीच्या अशाच काही गुणधर्मांबद्दल जाणून घेणार आहोत, की जे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात.

पोटासाठी हानीकारक

उष्णता हा हळदीचा मुख्य गुणधर्म आहे. हळद ही गरम असते. त्यामुळे हळदीचा आहारामध्ये अधिक वापर केल्यास पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्धभवू शकता. पोटात जळजळ होणे,सूज येणे सासरख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आहारात हळदीचा प्रमाणात उपयोग करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. ज्या रुग्णांना कावीळ झाला आहे, अशा रुग्णांच्या आहारामध्ये चुकूनही हळदीचा समावेश होता कामा नये, हळदीमुळे कावीळ वाढून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

त्वचेची समस्या

सर्वसाधारणपणे हळद त्वचेसाठी उत्तम माणण्यात येते. अनेक सौदर्यप्रसाधनांमध्ये हळदीचा उपयोग होतो. मात्र हळदीचा उपयोग हा प्रमाणात केला पाहिजे, हळदीच्या अति सेवनाने त्वचेशी निगडीत अनेक समस्या उद्धभवू शकतात. त्यामुळे हळदीचा एका ठराविक मात्रेतच उपोयग करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांना ऍलर्जीची समस्या आहे त्यांनी शक्यतो हळदीचे अतिसेवन टाळावे.

पथरीची समस्या

ज्या रुग्णांना पथरी रोगाची समस्या आहे, अशा रुग्णांसाठी हळदीचे सेवन घातक मानले जाते, हळदीमध्ये असेलेले काही गुणधर्म हे पथरी रोगाला वाढवणारे ठरतात, त्यामुळे ज्या रुग्णांना पथरीचा आजार आहे, अशा रुग्णांनी हळदीचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

नाकातून रक्त येणे

ज्या लोकांना सतत नाकातून रक्त येण्याची समस्या आहे, त्यांनी देखील हळदीचा आहारात मर्यादेत वापर करावा. हळदीचा अति वापर करू नये. याचे मुख्य कारण म्हणजे उष्णतेमुळे नाकातून रक्त येण्याचे प्रकार घडतता. हळद मुळात उष्ण असल्यामुळे हा प्रकार आणखी वाढून त्रास होऊ शकतो, त्यामुळे हळदीचे अति सेवन करू नये.

टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे, याच्या सतत्येबाबत टीव्ही 9 कोणतीही जबाबदारी घेत नाही. या सारखे उपाय करण्यापूर्वी एखाद्या विशेषतज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्यावा.

संबंधित बातम्या 

सावधान! तुम्हीही रोज सकाळी झोपेतून उशिरा उठता? तर होऊ शकतो मधुमेह; ब्रिगहॅम विद्यापीठाचा अहवाल

डोळ्यांच्या समस्याने त्रस्त आहात?, तर आजच ‘या’ पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा

Relationship tips: नात्यामध्ये दुरावा आलाय?, तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी, नातेसंबंध होतील अधिक मजबूत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.